- October 1, 2022
- No Comment
भरधाव कंटेनरची रिक्षा व दुचाकीला धडक,एकाचा मृत्यू
हडपसर: पुण्यातील हडपसर परिसरात आज सकाळच्या सुमारास भीषण अपघात झाला. भरधाव वेगात जाणाऱ्या कंटेनरने दुचाकी आणि रिक्षाला जबर धडक दिल्याने या अपघातात एका व्यक्तीचा मृत्यू झाला तर तिघेजण गंभीर जखमी झाले आहेत. पहाटे साडेपाच वाजण्याच्या सुमारास हा अपघात घडला.
पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, एका दुचाकीस्वाराला वाचवण्याच्या प्रयत्नात सिमेंट मिक्सर चालकाचे नियंत्रण सुटले आणि हा सिमेंट मिक्सर जागीच पलटी झाला. या सिमेंट मिक्सर खाली रिक्षा सापडल्याने रिक्षाचा चुराडा झाला. यामध्ये रिक्षा चालकाचा जागीच मृत्यू झाला आहे तर रिक्षातील तिघेजण जखमी झाले आहेत.

अपघातानंतर घटनास्थळी जमा झालेल्या नागरिकांनी तातडीने जखमींना जवळच्या रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. जखमी झालेल्यांची प्रकृती चिंताजनक आहे.