- September 18, 2022
- No Comment
कामशेत:गोडाऊन मधे मोठी चोरी, अडीच लाखाचा ऐवज जप्त
कामशेत: कामशेत येथील श्री साई एजन्सीच्या गोडाऊन मधून चोरट्यांनी चक्क अडीच लाख रुपयांचे तेल, तांदूळ असे किराणा साहित्य चोरून नेले आहे.
याप्रकरणी विशाल गोपाळ भानुसघरे (वय 30 रा. शिलाटणे, मावळ) यांनी कामशेत पोलीस ठाण्यात फिर्याद दिली असून अज्ञात चोरट्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांचे कामशेत येथे किराणा सामानाचे गोडाऊन आहे. गुरुवारी सांयकाळी बंद केलेले गोडाऊन चोरट्यांनी गोडाऊनच्या मागच्या भिंतीच्या खिडक्यांच्या ग्रील तोडून गोडाऊनमध्ये प्रवेश केला. त्यांनी गोडाऊनमधून तांदाळाचे 25 बॉक्स तेलाचे 80 ते 85 बॉक्स व रोख रक्कम 8 हजार 700 रुपये असा एकूण 2 लाख 67 हजार 808 रुपयांचा ऐवज चोरून नेला आहे.
पुढिल तपास कामशेत पोलीस करत आहेत.