- September 18, 2022
- No Comment
वडगाव मावळ: दादागिरीचा कहर, पैसे न दिल्याने डोक्यात काचेची बाटली फोडली
वडगाव मावळ: तुझ्या भावाला कारागृहातून सोडवतो पैसे दे अशी मागणी करत एकाला काचेची बाटली डोक्यात फोडून गंभीर जखमी केले आहे ही घटना वडगाव मावळ येथे घडली.
याप्रकरणी नितीन महादेव दिक्षीत (वय 43 रा. वडगाव) यांनी वडगाव मावळ पोलीस ठाण्यात फिर्याद दिली असून अक्षय रिटे, त्याचा एक मित्र (नाव पत्ता माहिती नाही) व अजिंक्य साळवे (रा. वडगाव मावळ) यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांचा भाऊ कारागृहात त्याची गुन्ह्याची शिक्षा भोगत आहे. त्यावरून तुझ्या भावाला सोडवतो तु आम्हाला पाच हजार रुपये दे अशी मागणी आरोपींनी फिर्यादी यांच्याकडे केली. यावेळी फिर्यादी यांनी त्याला नकार दिला. याच्या रागातून आरोपींनी त्यांच्या जवळील बिअरची बाटली फिर्यादीच्या डोक्यात मारून त्यांना जखमी केले. तसेच मारहाण करत खाली पाडून त्यांचा गळा दाबून जिवंत मारण्याचा प्रयत्न केला. यावरून आरोपींवर गुन्हा दाखल केला असून वडगाव मावळ पोलीस पुढील तपास करत आहेत.