- September 18, 2022
- No Comment
मांजरी सरपंचांवर मोठी कारवाई, सदस्यत्वही रद्द
मांजरी: विभागीय आयुक्त सौरभ राव यांनी मांजरी गावाच्या सरपंचांवर मोठी कारवाई केली आहे. विद्यमान सरपंच निखील उत्तम उंद्रे यांना सरपंचपदावरून हट विण्याबरोबरच त्यांचे सदस्यत्वही रद्द करण्यात आले आहे. मांजरी खुर्द ग्रामपंचायत सदस्य असताना मासिक सभेत नियम बाह्य ठरावाला मान्यता दिल्याने हि कारवाई करण्यात आली आहे.
ग्रामपंचायतच्या 22 मार्च 2021 रोजी झालेल्या मासिक सभेत एका शाळेबाबत हे नियमबाह्य ठराव झाल्याचे व त्या ठरावाला निखील उंद्रे यांनी मान्यता दिली असल्याची तक्रार माहिती अधिकार कार्यकर्ते संदीप उंद्रे यांनी केली होती. या प्रकरणाच्या चौकशीत निखील उंद्रे दोषी आढळल्याने विभागीय आयुक्त राव यांनी उंद्रे यांना सरपंचपदावरून हटविण्या बरोबरच त्यांचे ग्रामपंचायत सदस्यत्वही रद्द करण्याचे आदेश दिले आहेत.