- September 18, 2022
- No Comment
येरवडा: घरफोडी व वाहन चोरी करणारा सर्राइत जेरबंद
येरवडा: घरफोडी व वाहन चोरी करणाऱ्याला येरवडा पोलिसांनी गुरुवारी (दि.15) अटक केली असून त्याच्यावरील चार गुन्हे पोलिसांनी उघड केले आहेत.
यशदिप गोविंद कोंडार (वय 24 रा. विश्रांतवाडी) असे अटक आरोपीचे नाव आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, परिसरात गस्त घालत असताना पोलीस अमंलदार अमजद शेख व अनिल शिंदे यांना त्यांच्या बातमीदारामार्फत खबर मिळाली की, कोंडार नावाचा इसम हा त्याच्या जवळची चोरीची दुचाकी घेऊन येरवडा मेंटल हॉस्पीटलजवळ थांबला आहे. त्यानुसरा पोलिसांनी सापळा रचून पोलीस उपनिरीक्षक अंकुश डोंबाळे व पथकाने त्याला पकडले. त्याची चौकशी केली असता त्याचा जवळची स्कूटी चोरीची असल्याचे कबुल केले.
पोलीस कस्ट़डीमध्ये तपास केला असता त्याच्यावरील येरवडा, विश्रांतवाडी व मंचर येथील दोन गुन्हे उघडकीस आले. यापूर्वीही त्याने पुणे व पिंपरी-चिंचवड परिसरात 7 गुन्हे केले होते. त्याच्याकडून पोलिसांनी 3 दुचाकी, 1 लॅपटॉप असा एकूण 1 लाख 70 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.