- September 18, 2022
- No Comment
सावकारकी पडली चांगलीच महागात, दोन टाळक्यांवर गुन्हा दाखल, खंडणी विरोधी पथक दोन ची कामगिरी
पुणे: पाच टक्के व्याजाने कर्ज देणाऱ्या दोन सावकाराविरोधात गुन्हा दाखल केला आहे. ही कारवाई पुणे पोलिसांच्या खंडणी विरोधी पथक क्रमांक दोन यांनी केली आहे.
नवनाथ ज्ञानोबा मासाळ (रा. पुणे) व उमेश श्रीहरी मांगडे (रा. मागेवाडी, पुणे) यांच्यावर गुन्हा दाखल कऱण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मासाळ याच्याकडे तक्रारदाराने गरजेपोटी 10 लाख रुपये मागितले होते. यावेळी मासाळ याने फिर्यादी यांना मांगडे याच्याकडे जा; तो तुला 5 टक्के व्याजाने कर्ज देईल असे सांगितले. त्यानुसार मांगडेने कर्ज दिले. त्यामध्ये कर्ज देताना व्याजाचा हप्ता कापून घेऊन 9 लाख 50 हजार रुपये फिर्यादीला दिले. तसेच फिर्यादीची मर्सडिज बेन्स गाडी तारण म्हणून ठेऊन घेतली. यानंतर फिर्यादीने 4 लाख 10 हजार रुपये व्याजाचे काही हप्ते परत केले.
मात्र, पुढे हप्ते भरता न आल्याने मांगडे याने व्याजावर व्याजाची आकारणी केली. त्यानंतर मासाळशी संगनमत करून फिर्यादी यांचे 1 शॉप व 1 फ्लॅट तारण म्हणून ठेऊन घेतले. पुढे ते सोडविण्यासाठी 33 लाख रुपयांची अतिरीक्त मागणी केली. पैसे नाही दिले, तर घरात घुसून जीव घेण्याची धमकी दिली. यावरून फिर्यादी यांनी तक्रार दिली असता खंडणी विरोधी पथकाचे पोलीस निरीक्षक बालाजी पांढरे यांनी भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची कारवाई केली. याचा पुढिल तपास पोलीस उपनिरीक्षक मोहनदास जाधव करत आहेत.