- September 18, 2022
- No Comment
कौतुकास्पद: शिवणे येथे गणेश मूर्तीचे पुन्हा विसर्जन
शिवणे: खडकवासला धरण परिसरातील शिवणे, उत्तमनगर, कोपरे, कोंढवे धावडे परिसरातील विसर्जन केलेल्या बाप्पाच्या मूर्ती अत्यंत वाईट स्थितीत कॅनॉलच्या कडेला दिसून येत आहे.
उत्तमनगरमधील गणेश मित्र मंडळ सदस्यांनी पुढाकार घेऊन वाईट अवस्था झालेल्या गणपती मूर्तीचे पुन्हा व्यवस्थितपणे विसर्जन करून एक आदर्श निर्माण केला. वर्गणीसाठी फिरणारे, डिजेवर नाचणारे, व्यसनाधीन असणारे असे अनेक भेटतील. परंतु गणेश मुर्तींची विटंबना होत असताना एक पाउल पुढे टाकत सामाजिक बांधिलकी जपणाऱ्या या तरुण पिढीच खुप कौतुक.
या वेळी विनायक गायकवाड, दर्शन धावडे, जतीन मरोळ, हर्षल गायकवाड, साहिल जावळकर, ओमकार जावळकर, निखिल मरोळ, ओंकार चोरघे गणेश भक्तांनी हे संपूर्ण काम केले.