- October 4, 2022
- No Comment
फुलांचे बाजारभाव वाढले; दसऱ्याला बाजार भाव कडाडणार
आंबेगाव तालुक्यात फुलांचे गाव म्हणून प्रसिद्ध असलेल्या तांबडेमळ्यातून दररोज तीन टनापेक्षा अधिक झेंडूच्या फुलांची खरेदी पुणे, मुंबई,मंचर, नारायणगाव, लोणावळा भागातील व्यापारी वर्गाकडून केली जाते.’ असे शेतकरी निशानंद भोर व सुनील भोर यांनी सांगितले.’पितृ पधरवाड्यात झेंडूचे प्रती किलो बाजारभाव ३० ते ४० रुपये होते.नवरात्रीत ५० ते ६० रुपये बाजारभाव होते. सोमवारी (ता.३) १५० रुपये बाजारभावाने झेंडूची विक्री केली आहे. सर्वच फुलांचे बाजारभाव वाढल्याने ग्राहकही मोठ्या हाराएवजी लहान आकाराच्या हाराला पसंती देत आहेत.
सद्यस्थितीत फुलांचे बाजारभाव चढे राहतील.’ असे मंचर येथील फुल विक्रेते रतन निघोट यांनी सांगितले.मंचर बाजारातील फुल विक्री दरझेंडू – १४० रुपये किलोपांढरी शेवंती – २०० ते २२५ रुपये किलो.गुलछडी / रजनीगंधा – ३०० रुपये किलोगुलाब – प्रती २० रुपयेअस्टर – २०० रुपये शेकडा.