• October 4, 2022
  • No Comment

रेकॉर्ड वरील आरोपीकडुन ०२ पिस्टल व ०५ जिवंत काडतुस जप्त, लोणीकंद पोलीस तपास पथकाची उल्लेखनिय कामगिरी

रेकॉर्ड वरील आरोपीकडुन ०२ पिस्टल व ०५ जिवंत काडतुस जप्त, लोणीकंद पोलीस तपास पथकाची उल्लेखनिय कामगिरी

    लोणीकंद: लोणीकंद पोलीस तपास पथकाने रेकॉर्ड वरील आरोपीकडुन ०२ पिस्टल व ०५ जिवंत काडतुस जप्त करून आरोपीस अटक केली आहे.

    शुभ्रत बाळासाहेब बनसोडे, वय २२ वर्ष, रा. आदर्श कॉलनी, अण्णासाहेब मगर कॉलेज जवळ, हडपसर, पुणे असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे.

    पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, नवरात्र उत्सवानिमित्त लोणीकंद पोलीस ठाणे हद्दीत पेट्रोलिंग करीत असताना पोलीस नाईक ७४१९ स्वप्निल जाधव यांना केसनंद थेऊर रोडवरील कोलवडी माळवाडी येथील ज्योतीबा मंदिराजवळ पिवळ्या रंगाचा फुल बाहयांचा टी शर्ट व निळया रंगाची जिन्स पॅन्ट घातलेल्या एक मुलगा पिस्टल विक्री करण्यासाठी येणार असल्या ची खात्रीशिर बातमी मिळाल्याने सुचनांप्रमाणे कारवाई करुन आरोपीस ताब्यात घेतले आहे. आरोपी कडुन ०२ देशी बनावटीचे पिस्टल व ०५ जिवंत काडतुस जप्त करण्यात आले असुन आरोपीस अटक करण्यात आलेली आहे.

    सदरबाबत पुढील अधिक तपास श्री. गजानन जाधव, सहाय्यक पोलीस निरीक्षक हे करीत आहेत.

    सदरची कामगिरी मा. श्री. नामदेव चव्हाण साो, अपर पोलीस आयुक्त, पुर्व प्रादेशिक विभाग, पुणे शहर, मा. श्री. रोहीदास पवार सो, पोलीस उपआयुक्त साो, परिमंडळ ४, पुणे शहर, मा. श्री. किशोर जाधव साो, सहा. पोलीस आयुक्त साो, येरवडा विभाग, पुणे शहर, मा. श्री. गजानन पवार सो, वरिष्ठ पोलीस निरीक्षक, लोणीकंद पोलीस ठाणे, पुणे शहर, मा. श्री. मारुती पाटील सो, पोलीस निरीक्षक (गुन्हे), लोणीकंद पोलीस ठाणे, पुणे शहर, यांचे मार्गदर्शना खाली तपास पथकाचे सहा. पोलीस निरीक्षक गजानन जाधव, पोलीस अंमलदार स्वप्निल जाधव, विनायक साळवे, कैलास साळुंके, सागर जगताप, अमोल ढोणे, आशिष लोहार यांनी केली आहे.

    Related post

    गुलटेकडी मार्केट यार्डात अल्पवयीन मुलीशी गैरवर्तन; आरोपी हमाल पोलिसांच्या ताब्यात

    गुलटेकडी मार्केट यार्डात अल्पवयीन मुलीशी गैरवर्तन; आरोपी हमाल पोलिसांच्या…

    पुणे : पुण्यातील गुलटेकडी येथील मार्केट यार्ड आवारातील फळबाग विभागात खरेदीसाठी वडिलांसोबत आलेल्या 14 वर्षीय अल्पवयीन मुलीची छेडछाड केल्याची घटना घडली.…
    पुण्यात ६ कोटींची ऑनलाईन फसवणूक; आरोपीस ७ दिवसांची पोलीस कोठडी

    पुण्यात ६ कोटींची ऑनलाईन फसवणूक; आरोपीस ७ दिवसांची पोलीस…

    पुणे : शिवाजीनगर परिसरात ऑनलाईन गुंतवणुकीच्या आमिषाने तब्बल ६ कोटी ३० लाख ३५ हजार ५०० रुपयांची फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीस आला…
    छत्रपती शिवाजी महाराज यांच्या शिवजन्मोत्सव स्वराज्यरथ सोहळा भव्य उत्सवपूर्ण वातावरणात संपन्न,96 स्वराज्य रथांचा सहभाग

    छत्रपती शिवाजी महाराज यांच्या शिवजन्मोत्सव स्वराज्यरथ सोहळा भव्य उत्सवपूर्ण…

    पुणे: 19 फेब्रुवारी 2026 रोजी लाल महल येथून मिरवणूक, ढोलताशा, रणरागिणी आणि पुष्पवृष्टीचे आकर्षण शिवजयंती महोत्सव समिती पुणे तर्फे दरवर्षीप्रमाणे याही…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *