• October 4, 2022
  • No Comment

ऑनलाईन शॉपींग पडली महागात,आलेल्या एका लिंकवर क्लिक आणि बँक अकाऊंट रीकाम

ऑनलाईन शॉपींग पडली महागात,आलेल्या एका लिंकवर क्लिक आणि बँक अकाऊंट रीकाम

    पुणे: ऑनलाईन शॉपींग केलेले पार्सलकरीता अनोळखी आलेल्या लिंकवर क्लिीक करुन फसवणुक झालेल्या तक्रारदाराचे ४५,०००/- रुपये परत करण्यात शिवाजीनगर पोलीस स्टेशनला यश आले आहे.

    पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, शिवाजीनगर पोलीस ठाणे सायबर टिमकडे एका मुलीने तक्रार केली कि तीने ऑनलाईन शॉपींग केली. त्यानंतर त्या पार्सल पोहचवण्या करीता अनोळखी इसमाकडून तीला फोन आला. त्याने एक फिशी लिंक पाठवली. त्यालिंकवर क्लिक केल्यानंतर तक्रारदार यांचे मोबाईलचा ताबा सायबर गुन्हेगाराकडे गेला व त्याने तक्रारदार मुलीचे अकांऊट मधुन यु. पी. आय. ट्रान्झॅक्शनद्वारे एकुण ५५,०००/- काढुन घेतले. सदर तक्रारीचे अनुशंगाने शिवाजीनगर पोलीस ठाणे सायबर टिमने तात्काळ संबधीत वेग-वेगळया बॅकेची माहीती मिळवुन त्यांना संपर्क करुन अकांऊंट फ्रिज करुन तक्रारदार यांचे ४५,०००/- रुपये रिफंड करण्यात यश मिळवले असून, उर्वरित रक्कम रिफंड करीता प्रयत्न चालु आहेत.

    दिवाळी व इतर सणांचे तोंडावर ऑनलाईन खरेदी करताना अशा फसवणुकींची शक्यता जास्त आहे. तरी अनोळखी / अनधिकृत लिंकवर क्लिक करु नका. सायबर तक्रारीची नोंद

    http://cybercrime.gov.in या पोर्टलवर आणि १९३० या हेल्पलाईनवर तात्काळ तक्रार नोंदवावी असे आवाहन पुणे शहर पोलीसांमार्फत करण्यात येत आहे.

    पुणे शहराचे मा.पोलीस आयुक्त श्री अमिताभ गुप्ता व मा. पोलीस सह आयुक्त श्री संदीप कर्णीक यांचे संकल्पनेतुन पुणेकरांच्या सायबर तक्रारी संदर्भात न्याय मिळण्याकरीता प्रत्येक पोलीस ठाण्यास सायबर कक्ष स्थापन करण्यात आला आहे.

     

    Related post

    गुलटेकडी मार्केट यार्डात अल्पवयीन मुलीशी गैरवर्तन; आरोपी हमाल पोलिसांच्या ताब्यात

    गुलटेकडी मार्केट यार्डात अल्पवयीन मुलीशी गैरवर्तन; आरोपी हमाल पोलिसांच्या…

    पुणे : पुण्यातील गुलटेकडी येथील मार्केट यार्ड आवारातील फळबाग विभागात खरेदीसाठी वडिलांसोबत आलेल्या 14 वर्षीय अल्पवयीन मुलीची छेडछाड केल्याची घटना घडली.…
    पुण्यात ६ कोटींची ऑनलाईन फसवणूक; आरोपीस ७ दिवसांची पोलीस कोठडी

    पुण्यात ६ कोटींची ऑनलाईन फसवणूक; आरोपीस ७ दिवसांची पोलीस…

    पुणे : शिवाजीनगर परिसरात ऑनलाईन गुंतवणुकीच्या आमिषाने तब्बल ६ कोटी ३० लाख ३५ हजार ५०० रुपयांची फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीस आला…
    छत्रपती शिवाजी महाराज यांच्या शिवजन्मोत्सव स्वराज्यरथ सोहळा भव्य उत्सवपूर्ण वातावरणात संपन्न,96 स्वराज्य रथांचा सहभाग

    छत्रपती शिवाजी महाराज यांच्या शिवजन्मोत्सव स्वराज्यरथ सोहळा भव्य उत्सवपूर्ण…

    पुणे: 19 फेब्रुवारी 2026 रोजी लाल महल येथून मिरवणूक, ढोलताशा, रणरागिणी आणि पुष्पवृष्टीचे आकर्षण शिवजयंती महोत्सव समिती पुणे तर्फे दरवर्षीप्रमाणे याही…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *