- October 4, 2022
- No Comment
लाच मागणाऱ्या पोलीस उपनिरीक्षक व वकीलाला अटक
जुन्नर: दाखल गुन्ह्याचा ब फायनल करतो म्हणत एक लाख रुपयांची लाच मागणाऱ्या जुन्नर पोलीस ठाण्यातील पोलीस उपनिरीक्षक व वकिलाला रंगेहात पकडले आहे. कारवाई लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने केली आहे.
अमोल साहेबराव पाटील (वय 32) हा जुन्नर पोलीस ठाणे येथे पोलीस उपविरीक्षक या पदावर काम करत होता तर केतन अशोक पडवळ हा वकील आहे. दोघांनाही पोलिसांनी अटक केली असून न्यालयाने दोघांनाही 4 ऑक्टोबर पर्यंत पोलीसकोठडी सुनावली आहे. जुन्नर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी याच्यावर जुन्नर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल आहे. या गुन्ह्याचा ब फायनल करण्यास मदत करतो असे सांगत पाटील व पडवळ याने फिर्यादीकडे एक लाख रुपयांची मागणी केली. त्यानुसार सापळा रचून लाचलुचपत विभागाने आरोपींना अटक केले. याचा पुढील तपास लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पुणे विभागाच्या पोलीस निरीक्षक ज्योती पाटील करत आहेत.