- September 14, 2022
- No Comment
किरकोळ वादातून सावत्र आई-वडिल व भावंडाना मारहाण, आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल
दिघी: घरगुती भांडण सोडविण्यासाठी आलेल्या आई-वडिल व भावंडाना मुलाने साथीदारांसोबत मिळून सावत्र भावांसह, आई-वडिलांना बेदम मारहाण केली.
घटना समर्थ नगर, दिघी येथे घडली.
प्रमोद शिवाजी कोळेकर (वय 32, रा. समर्थ नगर, दिघी) यांनी याप्रकरणी दिघी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार प्रसाद कोळेकर (वय32), सुरज पाटोळे (वय 30, रा. मुंबई) आणि सुरजचे चार मित्र यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी प्रमोद, त्यांची सावत्र आई, सावत्र भाऊ यांचे आरोपी प्रसाद याच्यासोबत भांडण झाले होते. हे भांडण मिटविण्यासाठी परिसरात रहाणारे मनोज गायकवाड यांना फिर्यादींनी बोलावून आणले. वाद मिटवत असताना आरोपी प्रसाद याने त्याच्या साथीदारांसोबत मिळून सावत्र भाऊ फिर्यादी प्रमोद, भाऊ विजय यांना मारहाण केली. मनोज गायकवाड यांनाही मारहाण केली. भांडण सोडविण्यासाठी आलेल्या आईच्या डोक्यात मारून जखमी केले. त्यात आईच्या गळ्यातील मंगळसूत्र तुटले आणि गहाळ झाले. फिर्यादीचे वडील मध्ये आले असता त्यांनाही आरोपींनी मारहाण केली.
पुढील तपास दिघी पोलीस करीत आहेत.