आमदारासोबत काम करतो म्हणून एकाला शिवीगाळ, आरोपीविरुद्ध अट्रोसिटीचा गुन्हा दाखल
- क्राईम
- September 14, 2022
- No Comment
तळेगाव:आमदारासोबत काम करतो म्हणून एकाला जातीवाचक शिवीगाळ करण्यात आली आहे. त्यानुसार तळेगाव दाभाडे पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हा प्रकार तळेगाव येथील हरणेश्वर हॉस्पीटलजवळील म्हाडा कॉलनीत घडला.
यावरून संजय मैनाजी सदावर्ते (वय 56 रा. तळेगाव दाभाडे) यांनी फिर्याद दिली असून प्रमोद सांडभोर, अमोल भोकरे (दोघे रा. तळेगाव दाभाडे) यांच्या विरोधात अट्रोसिटीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांचा मुलगा संदीप हा आमदारांकडे काम करतो या कारणावरून आरोपींनी फिर्यादीच्या घराबाहेर येत जातीवाचक शिवीगाळ करत पळून गेला भेटला असता तर पाय तोडले असते, आमदारा सोबत राहून माज आला आहे अशी शिवीगाळ केली. यावरून तळेगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला असून पोलीस पुढील तपास करत आहेत.