गुंगीचे इंजेक्शन देऊन गाईला कत्तल करण्यासाठी नेणाऱ्या चार जणांच्या टोळीवर गुन्हा दाखल
- क्राईम
- September 14, 2022
- No Comment
भोसरी: फिरस्त्या गाईला गुंगीचे इंजेक्शन देऊन कत्तल करण्यासाठी गाईला चोरून नेल्याची घटना भोसरी गाव येथे घडली.
पोलीस शिपाई अनंता गवारी यांनी भोसरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार चार अनोळखी इसमाच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, भोसरी गाव येथे दिघी आळंदी रोडवर फिरस्ती गायीला चार जणांनी गुंगीचे इंजेक्शन देऊन बेशुद्ध केले. त्या गायीची कत्तल करण्यासाठी आरोपींनी तिला चोरून नेले. हा प्रकार मध्यरात्री साडेबारा वाजेच्या सुमारास घडला.
पुढील तपास भोसरी पोलीस करीत आहेत.