• January 18, 2023
  • No Comment

वानवाडी भागात १९ वर्षीय तरुणचा १३ वर्षीय अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार

वानवाडी भागात १९ वर्षीय तरुणचा १३ वर्षीय अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार

    पुणे येथील वानवाडी भागात १९ वर्षीय तरुण व १३ वर्षीय अल्पवयीन मुलगी शेजारी शेजारी राहते. तरुणाने त्या मुलीला खेळण्याच्या बाहण्याने बोलवले. त्यानंतर लग्नाचे आमिष दाखवत लैंगिक अत्याचार केल्याची घटना समोर आली आहे. “माझे तुझ्यावर खूप प्रेम आहे आपण लग्न करू” असे सांगत त्या तरुणाने अनेक वेळा अत्याचार केला.


    अशी उघड झाली घटना तरुण व अल्पवयीन मुलीसंदर्भात हा सगळा प्रकार किमान सहा महिने सुरु होता. काही दिवसांपूर्वी त्या मुलीने पोटात दुखत असल्याची तक्रार केली. त्यावेळी मुलीच्या आईने तिला दवाखान्यात नेले. डॉक्टरांनी तिच्या सर्व तपासण्या करुन घेतल्या. त्यात ती २८ आठवड्यांची गर्भवती असल्याचं रिपोर्टमधून समोर आलं. हे ऐकून मुलीच्या आईला धक्का बसला. तिने मुलीकडे विचारणा केली असता प्रकार उघड झाला. आता या घटनेसंबधी पीडित मुलीच्या आईने दिलेल्या तक्रारीनंतर त्या तरुणावर गुन्हा दाखल केला आहे. हा सगळा प्रकार जानेवारी ते जून २०२२ दरम्यान घडला असल्याचे समोर आले आहे.

    Related post

    पवना नगरातील हॉटेलमध्ये दादागिरी; कर्मचाऱ्यांना धमक्या देत मोबाईलवर शूटिंग

    पवना नगरातील हॉटेलमध्ये दादागिरी; कर्मचाऱ्यांना धमक्या देत मोबाईलवर शूटिंग

    लोणावळा;पवना नगर परिसरातील एका हॉटेलमध्ये नुकतीच धक्कादायक घटना घडली. एक व्यक्ती आपल्या कुटुंबासह हॉटेलमध्ये आला होता. हॉटेल परिसरातील पाण्याच्या दिशेने जाणे…
    गुलटेकडी मार्केट यार्डमध्ये ग्राहकांची वर्दळ घटली; विक्रीअभावी भाजीपाला शिल्लक 

    गुलटेकडी मार्केट यार्डमध्ये ग्राहकांची वर्दळ घटली; विक्रीअभावी भाजीपाला शिल्लक 

    प्रतिनिधी : सचिन गाडे पुणे : शहरातील प्रमुख भाजीपाला घाऊक बाजार म्हणून ओळखल्या जाणाऱ्या गुलटेकडी मार्केट यार्डमध्ये सध्या ग्राहकांची संख्या मोठ्या…
    स्वारगेट पोलिसांच्या रेकॉर्डवरील तडीपार आरोपी जेरबंद; गुन्हे शाखा युनिट 2 ची कारवाई

    स्वारगेट पोलिसांच्या रेकॉर्डवरील तडीपार आरोपी जेरबंद; गुन्हे शाखा युनिट…

    पुणे: स्वारगेट पोलीस ठाण्याच्या रेकॉर्डवरील तडीपार आरोपी शाबीर महंमद शेख उर्फ शाहू (वय ३५, रा. इंदिरानगर झोपडपट्टी, गुलटेकडी, पुणे) याला गुन्हे…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *