• January 18, 2023
  • No Comment

जुन्या वादातून वृद्ध जोडप्याला कोयत्याने हल्ला

जुन्या वादातून वृद्ध जोडप्याला कोयत्याने हल्ला

    पुणे : पुणे शहरामध्ये कोयता टोळीची दहशत प्रचंड वाढल्याचे आणखी एका घटनेतून समोर आले आहे. मागील काही दिवसांपासून हैदोस घालणार्‍या या टोळीने एका ज्येष्ठ नागरिकाला टार्गेट केल्याने परिसरात प्रचंड खळबळ उडाली आहे. संबंधित जेष्ठ नागरिक एका मोकळ्या मैदानावर आपला कुटुंबीयांसोबत झोपला होता. त्याचदरम्यान कोयता टोळीने तेथे येऊन कुटुंबीयांवर प्राणघातक हल्ला केला. या हल्ल्यात तक्रारदार ज्येष्ठ नागरिक जखमी झाला असून, तातडीच्या उपचारासाठी जवळच्या रुग्णालयात नेण्यात आले. या घटनेने ज्येष्ठ नागरिकांच्या सुरक्षेचा प्रश्नही ऐरणीवर आला आहे. पोलिसांनी कोयता टोळीला रोखण्यासाठी कठोर पावले उचलली असून सर्व आरोपींना लवकरच जेरबंद करू, असा विश्वास वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी व्यक्त केला आहे.

    ज्येष्ठ नागरिकावर केलेला हल्ला हा पूर्ववैमनस्यातून करण्यात आल्याचे उघड झाले आहे. कोयता टोळीतील तरुणांनी जुन्या भांडणाचा राग मनात धरून तक्रारदार सतिश भीमा काळे यांच्यावर कोयत्याने वार केल्याची माहिती समोर आली आहे.

    पुण्याच्या शिवाजीनगर भागातील एका मोकळ्या मैदानावर हा धक्कादायक प्रकार घडल्याने परिसरात प्रचंड खळखळ उडाली आहे. सतिश काळे आणि त्यांच्या पत्नी झोपेत असताना कोयता टोळीने त्यांच्यावर हल्ला केला.

    सतिश काळे यांचे काही तरुणांसोबत चार महिन्यापूर्वी किरकोळ कारणातून बाचाबाची झाली होती. या भांडणाचा राग मनात धरत चौघांनी मिळून काल रात्री हल्ला केला. याप्रकरणी दाद्या बगाडे, दिपू शर्मा, तुषार काकडे आणि मोन्या कुचेकर या चौघांविरोधात शिवाजीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

    Related post

    पवना नगरातील हॉटेलमध्ये दादागिरी; कर्मचाऱ्यांना धमक्या देत मोबाईलवर शूटिंग

    पवना नगरातील हॉटेलमध्ये दादागिरी; कर्मचाऱ्यांना धमक्या देत मोबाईलवर शूटिंग

    लोणावळा;पवना नगर परिसरातील एका हॉटेलमध्ये नुकतीच धक्कादायक घटना घडली. एक व्यक्ती आपल्या कुटुंबासह हॉटेलमध्ये आला होता. हॉटेल परिसरातील पाण्याच्या दिशेने जाणे…
    गुलटेकडी मार्केट यार्डमध्ये ग्राहकांची वर्दळ घटली; विक्रीअभावी भाजीपाला शिल्लक 

    गुलटेकडी मार्केट यार्डमध्ये ग्राहकांची वर्दळ घटली; विक्रीअभावी भाजीपाला शिल्लक 

    प्रतिनिधी : सचिन गाडे पुणे : शहरातील प्रमुख भाजीपाला घाऊक बाजार म्हणून ओळखल्या जाणाऱ्या गुलटेकडी मार्केट यार्डमध्ये सध्या ग्राहकांची संख्या मोठ्या…
    स्वारगेट पोलिसांच्या रेकॉर्डवरील तडीपार आरोपी जेरबंद; गुन्हे शाखा युनिट 2 ची कारवाई

    स्वारगेट पोलिसांच्या रेकॉर्डवरील तडीपार आरोपी जेरबंद; गुन्हे शाखा युनिट…

    पुणे: स्वारगेट पोलीस ठाण्याच्या रेकॉर्डवरील तडीपार आरोपी शाबीर महंमद शेख उर्फ शाहू (वय ३५, रा. इंदिरानगर झोपडपट्टी, गुलटेकडी, पुणे) याला गुन्हे…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *