- January 16, 2023
- No Comment
दोन तोयता पोलीसांनी वाघोलीत एका व्यापाऱ्याला 10 हजार रुपयांना लुटले
मी पोलीस आहे. तुम्ही बंदी असतानाही हे विकता ते विकता. असा बहाणा
करून दोन तोतया पोलीसांनी व्यापार्याकडून पैसे उकळण्याचा प्रकार
सुरू केला आहे. बायफ रोडवरील एका व्यापाऱ्याला दहा हजार रुपयांचा
फटका बसल्याचेही समजते. कोणत्याही दुकानात घुसून ते असा प्रकार
करीत आहे. तुम्ही मांजा विकता असे म्हणून एका दुकानात त्यांनी
पहाणी केल्याचे ही कळते. मात्र मांजा आढळून न आल्याने ते परतले.
पाटील व काळभोर अशी नावे ते सांगत असल्याचे समजते. साध्या
वेशातच ते फिरत आहे. व्यापाऱ्यांनी दक्षता बाळगावी. असा संशय
आल्यास तात्काळ पोलिसांशी संपर्क साधावा.