- January 16, 2023
- No Comment
बीट मार्शलवर सपासप वार करुन फरार झालेल्या आरोपीला अटक
पुण्यातील विमानतळ पोलीस ठाण्याच्या हद्दीत रात्री उशीरापर्यंत सुरु असलेले चायनिज सेंटर बंद केल्याच्या रागातून एकाने बीट मार्शल वर चाकूने वार केल्याची घटना घडली आहे. या गुन्ह्यातील फरार आरोपीला बंडगार्डन पोलिसांनी अटक केली आहे. महानंदेश्वर उर्फ मल्ल्या महादेव बताले (वय 24 रा. नळदुर्ग, जि. उस्मानाबाद) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे.
पोलीस नाईक सचिन उत्तम जगदाळे असे गंभीर जखमी झालेल्या पोलीस कर्मचाऱ्याचे नाव असून त्यांनी विमानतळ पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. याप्रकरणी महानंदेश्वर उर्फ मल्ल्या महादेव बताले याच्यावर आयपीसी 353, 333, महाराष्ट्र पोलीस कायद्यांतर्गत गुन्हा दाखल केला आहे. ही घटना शनिवारी रात्री सव्वा अकराच्या सुमारास समायरा चायनिज सेंटर, धानोरी जकात नाका, लोहगाव येथे घडली.
विमातळ पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या गुन्ह्यातील आरोपी पुणे स्टेशन परिसरात येणार असल्याची माहिती बंडगार्डन पोलीस ठाण्यातील पोलीस अंमलदार यांना समजली. त्यानुसार तपास पथकाने सापळा रचून आरोपीला ताब्यात घेतले. अटक करण्यात आलेल्या आरोपीला पुढील कार्यवाहीसाठी विमानतळ पोलीस ठाण्याच्या ताब्यात दिले आहे.
ही कामगिरी पोलीस उपायुक्त परिमंडळ 2 स्मार्तना पाटील , सहाय्यक पोलीस आयुक्त आर.एन. राजे
वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रताप मानकर
पोलीस निरीक्षक (गुन्हे) अश्विनी सातपुते यांचे
मार्गदर्शनाखाली पोलीस उप निरीक्षक रवींद्र गावडे पोलीस अंमलदार अमोल सरडे,
राजू धुलगुडे, विलास केकान, शंकर संपते, ज्ञाना बडे, मनोज भोकरे, संजय वनवे यांच्या पथकाने केली आहे.