- January 16, 2023
- No Comment
पुण्याच्या हडपसरमध्ये 2013 साली कोयत्याने वार करून हत्या झालेल्या प्रकाश गोंधळे प्रकरणातील हिंदू राष्ट्रसेनेचे कार्यकर्ते असलेल्या 9 आरोपींना जन्मठेपेची शिक्षा
पुण्याच्या हडपसरमध्ये 2013 साली कोयत्याने वार करून हत्या झालेल्या प्रकाश गोंधळे प्रकरणातील हिंदू राष्ट्रसेनेचे कार्यकर्ते असलेल्या 9 आरोपींना जन्मठेपेची शिक्षा ठोठावण्यात आली आहे. दहा वर्षांपूर्वीच पोलिसांनी या प्रकरणाला गांभीर्यानं घेतलं असतं तर आज कोयता गॅंग उदयास आली नसती, अशी प्रतिक्रिया मयत प्रकाश गोंधळेचे भाऊ राजू गोंधळे यांनी दिलीये. दहा वर्षाने का होईना अखेर न्याय मिळाल्याने त्यांनी पोलीस प्रशासन आणि न्यायालयाचे आभार मानले आहेत. आरोपींना जन्मठेपेची मिळालेली शिक्षा हीच प्रकाश गोंधळेंना मिळालेली खरी श्रद्धांजली असल्याची भावना त्यांनी राजू गोंधळेंनी व्यक्त केली.
हिंदू राष्ट्रसेनेचे कार्यकर्ते विकी जाधव, वैभव भाडळे, अक्षय इंगुळकर, श्रीकांत आटोळे, अमोल शेडगे, राहुल कौले, विकी पाटील, सुरज फडके आणि आकाश शिंदे अशी शिक्षा झालेल्यांची नावे आहेत. त्यांना आयपीसी कलम 302 तसेच 506(2) अंतर्गत 2 वर्षे, फौजदारी कलम 7 च्या तरतुदीनुसार 6 महिने आणि प्रत्येक आरोपीला 20 हजार रूपये दंड सुनावण्यात आला आहे. या शिवाय आरोपींनी दीड लाख रुपये प्रकाश गोंधळे यांच्या कुटुंबियांना द्यावे, असं या आदेशात सांगण्यात आलं आहे.