• January 16, 2023
  • No Comment

सिगारेट दिली नाही या कारणावरुन कोयत्याचा धाक दाखवून धमकावले

सिगारेट दिली नाही या  कारणावरुन कोयत्याचा धाक दाखवून धमकावले

    सिगारेट दिली नाही या कारणावरुन मोटारसायकलवरुन आलेल्या ११ जणांनी सिंहगड -पानशेत रोडवरील गोर्‍हे गावात धुडगुस घातला. हवेत कोयते फिरवून येणार्‍या जाणार्‍याला धमकावून जीवे मारण्याची धमकी दिल्याचा प्रकार रविवारी सायंकाळी घडला.

    याप्रकरणी एका महिला दुकानदाराने हवेली पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार पोलिसांनी नचिकेत संजय जगताप, सुरज लगींदर ठाकूर, यश संजय जगताप, अक्षय चव्हाण ऊर्फ चपाती मोन्या, अनुप शेलार, निलेश सहा, सागर कांतू पाटील, अक्षय पारगे, अनिकेत मोरे, करण शिंदे, पंकज दिलीप चव्हाण (सर्व रा. गोर्‍हे बुद्रुक) यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.


    माहितीनुसार फिर्यादी या त्यांच्या दुकानात असताना टोळके मोटारसायकलवरुन आले. त्यांनी फिर्यादीकडे सिगारेट मागितली. दुकानात सिगारेट नसल्याचे त्यांनी सांगितले. त्यानंतर ते मोटारसायकल जोरात रेस करुन चालवू लागले. त्यांच्या शेजारील एका आजीला ते कट मारुन जाऊ लागले. पुढे जाऊन पुन्हा गाडी वळवली. तेव्हा फिर्यादी यांच्या शेजारी राहणार्‍यांनी मुले खेळत आहेत, मोटार सायकल हळू चालवा, असे यश जगताप याला सांगितले. तेव्हा या टोळक्याने त्यांना शिवीगाळ करून दमदाटी करुन मारहाण करण्यासाठी त्यांचे अंगावर धावून जाऊ लागले. तेव्हा फिर्यादीमध्ये पडल्याने यश जगताप यांनी त्यांना ढकलून दिल्याने त्या रोडवर खाली पडल्या. जमलेल्या लोकांनी त्यांना निघून जाण्यास सांगितले.

    तेव्हा ते निघून गेले. मात्र, पाच मिनिटांनी सर्व जण पुन्हा आले.
    गोरखचे सलूनजवळ मोटार सायकली उभ्या करुन व येणार्‍या जाणार्‍या लोकांना शिवीगाळ -दमदाटी करुन हातातील कोयता दाखवुन दहशत पसरु लागले.

    Related post

    पवना नगरातील हॉटेलमध्ये दादागिरी; कर्मचाऱ्यांना धमक्या देत मोबाईलवर शूटिंग

    पवना नगरातील हॉटेलमध्ये दादागिरी; कर्मचाऱ्यांना धमक्या देत मोबाईलवर शूटिंग

    लोणावळा;पवना नगर परिसरातील एका हॉटेलमध्ये नुकतीच धक्कादायक घटना घडली. एक व्यक्ती आपल्या कुटुंबासह हॉटेलमध्ये आला होता. हॉटेल परिसरातील पाण्याच्या दिशेने जाणे…
    गुलटेकडी मार्केट यार्डमध्ये ग्राहकांची वर्दळ घटली; विक्रीअभावी भाजीपाला शिल्लक 

    गुलटेकडी मार्केट यार्डमध्ये ग्राहकांची वर्दळ घटली; विक्रीअभावी भाजीपाला शिल्लक 

    प्रतिनिधी : सचिन गाडे पुणे : शहरातील प्रमुख भाजीपाला घाऊक बाजार म्हणून ओळखल्या जाणाऱ्या गुलटेकडी मार्केट यार्डमध्ये सध्या ग्राहकांची संख्या मोठ्या…
    स्वारगेट पोलिसांच्या रेकॉर्डवरील तडीपार आरोपी जेरबंद; गुन्हे शाखा युनिट 2 ची कारवाई

    स्वारगेट पोलिसांच्या रेकॉर्डवरील तडीपार आरोपी जेरबंद; गुन्हे शाखा युनिट…

    पुणे: स्वारगेट पोलीस ठाण्याच्या रेकॉर्डवरील तडीपार आरोपी शाबीर महंमद शेख उर्फ शाहू (वय ३५, रा. इंदिरानगर झोपडपट्टी, गुलटेकडी, पुणे) याला गुन्हे…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *