• January 18, 2023
  • No Comment

मंगलदास बांदल यांना जामीन मंजूर

मंगलदास बांदल यांना जामीन मंजूर

    जिल्हा परिषदेचे माजी बांधकाम समितीचे सभापती मंगलदास बांदल यांना उच्च न्यायालयाने त्यांच्यावर दाखल असलेल्या चारही गुन्ह्यांमध्ये जामीन मंजूर केला. पुण्यातील शिवाजीराव भोसले सहकारी बँक गैरव्यवहार प्रकरणी गेली २१ महिने न्यायालयीन कोठडीत होते. या प्रकरणातील अटक असलेले सर्व बँक अधिकारी व सहआरोपी यांनाही जामीन मंजूर झाला

    शिक्रापूर येथील सोसायटीचे माजी अध्यक्ष दत्तात्रय मांढरे यांच्या तक्रारीवरून बांदल यांच्यावर फसवणुकीचा गुन्हा दाखल झाला होता. शिवाजीराव भोसले सहकारी बँकेतील काही अधिकाऱ्यांना सोबतीने गुन्हे घडल्याच्या तक्रावरून बांदलांसह त्यांचे काही जवळचे मित्र व काही बँक अधिकारी यांना अटक झाली होती. अशाच पद्धतीचे बांदल यांच्याशी संबंधित तक्रारी दाखल झाले होते व एकुण ४ गुन्हे बांदल यांच्याशी संबंधित दाखल होते. या प्रकरणाशी संदर्भात आज महत्त्वपूर्ण सुनावणी उच्च न्यायालयात झाली. त्यात बांदल यांचे सह त्यांचे सर्व अटक असलेल्या सहकाऱ्यांना उच्च न्यायालयाने जामीन मंजूर केल्याची माहिती शिक्रापूरच्या पोलीस सूत्रांनी यांनी दिली. दरम्यान न्यायालयीन आदेश अद्याप अपलोड झाला नसून अपलोड झाल्यानंतर सर्वांची नावे जाहीर होतील. जामिन प्रक्रियेला पुढील ४ ते ५ दिवस लागतील नंतरच बांदल बाहेर येवू शकणार असल्याची माहिती त्यांची सदर केस चालविणारे वकील प्रतिनिधी अॅड अदित्य सासवडे यांनी दिली.

    Related post

    पवना नगरातील हॉटेलमध्ये दादागिरी; कर्मचाऱ्यांना धमक्या देत मोबाईलवर शूटिंग

    पवना नगरातील हॉटेलमध्ये दादागिरी; कर्मचाऱ्यांना धमक्या देत मोबाईलवर शूटिंग

    लोणावळा;पवना नगर परिसरातील एका हॉटेलमध्ये नुकतीच धक्कादायक घटना घडली. एक व्यक्ती आपल्या कुटुंबासह हॉटेलमध्ये आला होता. हॉटेल परिसरातील पाण्याच्या दिशेने जाणे…
    गुलटेकडी मार्केट यार्डमध्ये ग्राहकांची वर्दळ घटली; विक्रीअभावी भाजीपाला शिल्लक 

    गुलटेकडी मार्केट यार्डमध्ये ग्राहकांची वर्दळ घटली; विक्रीअभावी भाजीपाला शिल्लक 

    प्रतिनिधी : सचिन गाडे पुणे : शहरातील प्रमुख भाजीपाला घाऊक बाजार म्हणून ओळखल्या जाणाऱ्या गुलटेकडी मार्केट यार्डमध्ये सध्या ग्राहकांची संख्या मोठ्या…
    स्वारगेट पोलिसांच्या रेकॉर्डवरील तडीपार आरोपी जेरबंद; गुन्हे शाखा युनिट 2 ची कारवाई

    स्वारगेट पोलिसांच्या रेकॉर्डवरील तडीपार आरोपी जेरबंद; गुन्हे शाखा युनिट…

    पुणे: स्वारगेट पोलीस ठाण्याच्या रेकॉर्डवरील तडीपार आरोपी शाबीर महंमद शेख उर्फ शाहू (वय ३५, रा. इंदिरानगर झोपडपट्टी, गुलटेकडी, पुणे) याला गुन्हे…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *