• January 18, 2023
  • No Comment

पुणे पोलिसांनी काढली कोयता गँगच्या तरुणांची हलगी वाजवत भर रस्त्यात धिंड

पुणे पोलिसांनी काढली कोयता गँगच्या तरुणांची हलगी वाजवत भर रस्त्यात धिंड

    कोयता गँगच्या तरुणांची हलगी वाजवत धिंड काढण्यात आली. कोयता घेऊन दहशत माजवणाऱ्यांची रस्त्यावर पोलिसांनी वरात काढली. त्यांची ही धिंड पाहून अनेक व्यापाऱ्यांना आनंद झाला. जुन्या भांडणाच्या कारणावरून एकाचा खून करण्यासाठी घातक शस्त्र जमा करणाऱ्या एका टोळीला पोलिसांनी अटक केली. हा सगळा प्रकार पुण्यातील कोंढवा भागात घडला. त्या टोळीत पाच जणांचा समावेश असून त्यातील तीन जण अल्पवयीन आहेत.


    पोलिसांनी या टोळीतील दोघांना अटक केली असून ज्या ठिकाणी या आरोपींनी दहशत माजवली होती, त्याच ठिकाणी पोलिसांनी त्यांची धिंड काढली. अनवाणी पायाने पोलिसांनी त्यांना संपूर्ण परिसरातून फिरवले. दहशत वाजवणाऱ्या या गुंडांची अशी अवस्था पाहून परिसरातील नागरिकांनी समाधान व्यक्त केले. पुण्यात मागील काही दिवसांपासून कोयता गॅंगने दहशत माजवली आहे. अनेक परिसात या गॅंगने धुमाकूळ घातला अनेक व्यापाऱ्यांच्या दुकानाची तोडफोड करत नुकसान केलं. त्यामुळे या दोन्ही आरोपींची धिंड पाहून व्यापाऱ्यांना आनंद झाला आहे.

    Related post

    पवना नगरातील हॉटेलमध्ये दादागिरी; कर्मचाऱ्यांना धमक्या देत मोबाईलवर शूटिंग

    पवना नगरातील हॉटेलमध्ये दादागिरी; कर्मचाऱ्यांना धमक्या देत मोबाईलवर शूटिंग

    लोणावळा;पवना नगर परिसरातील एका हॉटेलमध्ये नुकतीच धक्कादायक घटना घडली. एक व्यक्ती आपल्या कुटुंबासह हॉटेलमध्ये आला होता. हॉटेल परिसरातील पाण्याच्या दिशेने जाणे…
    गुलटेकडी मार्केट यार्डमध्ये ग्राहकांची वर्दळ घटली; विक्रीअभावी भाजीपाला शिल्लक 

    गुलटेकडी मार्केट यार्डमध्ये ग्राहकांची वर्दळ घटली; विक्रीअभावी भाजीपाला शिल्लक 

    प्रतिनिधी : सचिन गाडे पुणे : शहरातील प्रमुख भाजीपाला घाऊक बाजार म्हणून ओळखल्या जाणाऱ्या गुलटेकडी मार्केट यार्डमध्ये सध्या ग्राहकांची संख्या मोठ्या…
    स्वारगेट पोलिसांच्या रेकॉर्डवरील तडीपार आरोपी जेरबंद; गुन्हे शाखा युनिट 2 ची कारवाई

    स्वारगेट पोलिसांच्या रेकॉर्डवरील तडीपार आरोपी जेरबंद; गुन्हे शाखा युनिट…

    पुणे: स्वारगेट पोलीस ठाण्याच्या रेकॉर्डवरील तडीपार आरोपी शाबीर महंमद शेख उर्फ शाहू (वय ३५, रा. इंदिरानगर झोपडपट्टी, गुलटेकडी, पुणे) याला गुन्हे…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *