• May 11, 2023
  • No Comment

रात्रीच्या वेळी पादचारी इसमास लुटणा-या चोरास केली अटक चोरीचे एकुण ०८ मोबाइल जप्त

रात्रीच्या वेळी पादचारी इसमास लुटणा-या चोरास केली अटक चोरीचे एकुण ०८ मोबाइल जप्त

रात्रीच्या वेळी एकटा असल्याचा फायदा घेवुन पायी चालत जाणारे एका पादचारी इसमास लुटणा-या चोरास त्याचा माग काढुन अटक करण्यात व त्याचेकडुन चोरीचे एकुण ०८ मोबाइल जप्त करण्यात खडक पोलीस स्टेशनच्या तपास पथकास यश आले आहे.सदर बाबत अधिक माहीती अशी की, फिर्यादी यांनी दिलेल्या तक्रारी नुसार
मिसाळ चौक,शिवाजी रोड, पुणे येथे सार्वजनीक रोडवर एका अनोळखी इसमाने फिर्यादी यांना धमकावुन त्यांच्याशी झटापट करुन त्यांच्या पॅन्टच्या खिशात हात घालुन बळजबरीने खिशातुन रोख रक्कम २५००/- रुपये व मोबाइल तसेच उजव्या हाताचे बोटातील अंगठी जबरदस्तीने चोरुन नेली. याबाबत खडक पोलीस स्टेशन गुन्हा दाखल करण्यात आला. रात्रीच्या वेळेस अशा प्रकारे पादचारी व्यक्तिस धमकावुन लुटण्याचा प्रकार घडल्याने त्याबाबत वरीष्ठ पोलीस निरीक्षक श्रीमती संगिता यादव यांनी तात्काळ दखल घेवुन श्री. संपतराव राऊत, पोलीस निरिक्षक गुन्हे यांच मार्फत तात्काळ दोन तपास पथके तयार करुन त्यांना तपासाबाबत योग्य सुचना दिल्या.


वरिष्ठ पोलीस निरिक्षक श्रीमती संगिता यादव यांनी तपास पथकास दिलेल्या सुचनाप्रमाणे तपास पथकातील अंमलदार संदीप तळेकर, मंगेश गायकवाड, अक्षयकुमार वाबळे हे गस्त करीत असताना त्यांना त्यांच्या बातमीदाराने बातमी दिली की, जबरी चोरी करणारा इसम हा गाडीखाना चौक, मंडई येथे आला असल्याची खात्रीशीर माहीती प्राप्त झाली. त्या अनुषंगाने सदर ठिकाणी जावुन जबरी चोरी करणारा आरोपी सजाद मोहम्मद हनीफ शेख,वय ४२ वर्षे, रा. इंद्रायणी कॉलनी कामशेत पुणे, सध्या रा. लोहीयानगर पेट्रोल पंपजवळ पुणे फिरस्ता
यास सापळा रचुन शिताफीने ताब्यात घेवुन दाखल गुन्हयात अटक करण्यात आली आहे. गुन्हयातील अटक आरोपी सजाद मोहम्मद हनीफ शेख, वय ४२ वर्षे याचेकडुन गुन्हयात जबरी चोरी केलेली १) २५००/- रू रोख रक्कम रु. १२,०००/- किंमतीचा एक व्हिवो कपंनीचा मोबाइल व रु.१५,०००/ किंमतीची एक सोन्याची अंगठी अंदाजे २.५ ग्रॅम वजनाची अशी मालमत्ता जप्त करण्यात आली आहे. तसेच या व्यतिरीक्त अटक आरोपीकडुन ओप्पो कपंनीचे ०४ मोबाइल व्हिवो कपंनीचे ०२ मोबाइल, वन प्लस कंपनीचा ०१ मोबाइल असे एकुण ९६,०००/रु किंमतीचे ०७ मोबाइल जप्त करण्यात आले आहेत. त्या अनुषंगाने अधिक तपास चालु आहे. अशा प्रकारे अटक आरोपीकडुन एकुण १,२५,५००/ रुपयांचा ऐवज जप्त करण्यात आला आहे.
नमुद कारवाई मा अपर पोलीस आयुक्त पश्चिम प्रादेशिक विभाग पुणे, श्री. प्रविण पाटील, मा. पोलीस उप आयुक्त परिमंडळ १ पुणे श्री. संदिपसिंह गिल, व मा. सहा पोलीस आयुक्त फरासखाना विभाग श्री. सतिश गोवेकर यांचे मार्गदर्शनाखाली खडक पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्रीमती संगीता यादव, पोलीस निरीक्षक (गुन्हे), श्री.संपतराव राऊत सहा पोलीस निरीक्षक राकेश जाधव, पोलीस उप निरीक्षक अतुल बनकर, व पोलीस अंमलदार अजीज बेग, संदीप तळेकर, विशाल जाधव, सागर घाडगे, लखन ढावरे, मंगेश गायकवाड, रफिक नदाफ, सागर कुडले, अक्षयकुमार वाबळे, नितीन जाधव, महेश पवार, स्वप्निल बांदल यांचे पथकाने केली आहे.

Related post

खुनाच्या गुन्ह्यातील आरोपीस जामीन मंजूर 

खुनाच्या गुन्ह्यातील आरोपीस जामीन मंजूर 

    पुणे; खून प्रकरणात कलम ३०२, २०१ आरोपी गुन्हा कबुलीचे निवेदन असताना आरोपी नामे अब्दुला उर्फ बबलू सरदार यास जिल्हा…
मित्राबरोबर फिरायला बोपदेव घाटात गेलेल्या  तरुणीवर रात्री गँगरेप

मित्राबरोबर फिरायला बोपदेव घाटात गेलेल्या तरुणीवर रात्री गँगरेप

लुटमारीच्या घटना कायम होत असतात, परंतु मित्रासोबत फिरायला गेलेल्या एका महिलेवर तिन जणांनी बलात्कार केल्याची गंभीर घटना काल रात्री घडली. या…
घरफोडी करणारा अट्टल गुन्हेगार जेरबंद ! घरफोडीचे ०३ गुन्हे उघड गुन्हे शाखा युनिट ६ ची कारवाई

घरफोडी करणारा अट्टल गुन्हेगार जेरबंद ! घरफोडीचे ०३ गुन्हे…

गुन्हे शाखा युनिट-६ कडील पथक युनिट हद्दीत गुन्हे प्रतिबंधात्मक व गुन्हेगार चेकिंग पेट्रोलिंग करित असताना युनिटकडील अंमलदारास मिळालेल्या गुप्त बातमी वरुन…

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *