- May 11, 2023
- No Comment
बेकायदेशिर रित्या अंमली पदार्थ विक्री करणारा अटक ; दोन्ही कारवाईत ९,५०,७५०/- रुपये किंचे ३५ ग्रॅम मॅफोड्रोन (एम.डी.) हा अंमली पदार्थ जप्त
अंमली पदार्थ विरोधी पथक – १ कडील अधिकारी व स्टाफ बंडगार्डन पोलीस स्टेशन कार्यक्षेत्रात पेट्रोलिंग करीत असताना, पोलीस अंमलदार, योगेश मोहिते व विशाल शिंदे यांना त्यांचे बातमीदारामार्फत माहिती मिळाली की, पुणे आर. टी.ओ. संगम ब्रीज समोर सार्वजनिक रोडवर इसम नामे समीउल्ला सलीम शेख हा त्याचे ओळखीचे लोकांना मेफेड्रॉन (एम.डी.) हा अंमली पदार्थ विक्री करीत आहे.
नमुद प्रमाणे मिळालेले बातमीचे अनुषंगाने कायदेशिर कारवाई करणेबाबत वरिष्ठ पोलीस निरीक्षक, विनायक गायकवाड यांनी पोलीस अधिकारी व अंमलदार यांनी केलेल्या सुचनेनुसार पोलीस अधिकारी व स्टाफने सदर ठिकाणी सापळा रचुन इसम नामे समीउल्ला सलीम शेख, वय – २७ वर्षे, रा. घर नं. ३३, पठाण चाळ, बोपोडी, पुणे यांस ताब्यात घेवुन त्याची झडती घेतली असता, त्याचे ताब्यात २,८०,००० /- रू किचा ऐवज त्यामध्ये ०९ ग्रॅम मेफेड्रॉन
(एम.डी.) हा अंमली पदार्थ रु १,८०,०००/- रू किचा, एक बर्गमॅन गाडी नं. एमएच/१२/टीजी / ८११९ रुपये ९०,०००/- किचीएक वनप्लस कंपनीचा मोबाईल १०,०००/- रू किचा असा ऐवज अंमली पदार्थासह अनाधिकाराने, बेकायदेशिर रित्या विक्रीकरीता जवळ बाळगताना मिळुन आला म्हणुन त्यांचे विरुध्द व त्याचे साथीदार विरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्याचप्रमाणे खडकी पो स्टे कार्यक्षेत्रात अंमली पदार्थ विरोधी पथक-१ कडील अधिकारी व स्टाफ असे पेट्रोलिंग करीत असताना बोपोडी भागातील मिलींदनगर या ठिकाणी असणारे एस. आर. ए. बिल्डींगचे समोरील रोडवर
इसम नामे जितु सुंदर नायडु हा त्याचे ओळखीचे लोकांना मेफेड्रॉन (एम.डी.) हा अंमली पदार्थ विक्री करीत असले बाबत पोलीस अंमलदार, योगेश मोहिते व विशाल शिंदे यांना त्यांचे बातमीदारामार्फत माहिती मिळाली, त्याप्रमाणे सदर ठिकाणी जावुन छापा कारवाई करुन, इसम नामे जितु सुंदर नायडु, वय-३३ वर्षे, रा.सर्व्हे नं. २६, अगरवाल चाळ, एसआरए. बिल्डींग जवळ,बोपोडी, पुणे यांस ताब्यात घेवुन त्याची झडती घेतली असता, त्याचेजवळ ६,७०,७५०/- रू
किचा ऐवज त्यामध्ये २६ ग्रॅम ०२ मिलीग्रॅम मेफेड्रॉन (एम.डी.) हा अंमली पदार्थ ५,२४,०००/-रू किचा, १,४५,७५०/- रूपये रोख रक्कम एक इलेक्ट्रॉनिक वजन काटा १,०००/- व एक लाल रंगाची पिशवी असा ऐवज मिळुन आल्याने, गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
वरील नमुद दोन्ही कारवाईतील आरोपी हे ऐकमेकाचे संपर्कात असुन ते मुंबई येथुन मेफेड्रॉन (एम.डी.) हा अंमली पदार्थ आणुन त्याची पुणे शहरात विक्री करीत असल्याचे प्राथमिक तपासात निदर्शनास येत आहे. वरील नमुद दोन्ही कारवाई मध्ये पोलीस नाईक विशाल शिंदे यांनी नमुद आरोपी विरुध्द फिर्याद दिलेली असुन, बंडगार्डन पो
स्टे व खडकी पो स्टे त्याबाबत तपास करीत आहेत.
सदरची उल्लेखनीय कामगिरी ही मा. पोलीस आयुक्त श्री रितेश कुमार, मा. सह पोलीस आयुक्त श्री.संदिप कर्णिक, मा.अपर पोलीस आयुक्त, गुन्हे, श्री रामनाथ पोकळे, मा.पोलीस उप-आयुक्त, गुन्हे, श्री. अमोल झेंडे, मा.सहा पोलीस आयुक्त, गुन्हे-२, श्री सुनिल पवार यांचे मार्गदर्शनाखाली अंमली पदार्थ विरोधी पथक-२, गुन्हे शाखा, पुणे शहर कडील वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री. विनायक गायकवाड, सहा. पोलीस निरीक्षक, लक्ष्मण ढेंगळे, शैलजा जानकर, पोलीस अंमलदार, विशाल शिंदे, योगेश मोहिते, मनोजकुमार साळुंके, मारुती पारधी, प्रविण उत्तेकर, विशाल दळवी, पांडुरंग पवार, संदिप शिर्के, सुजित वाडेकर, ज्ञानेश्वर घोरपडे, राहुल जोशी, सचिन माळवे, नितेश जाधव,रेहाना शेख, यांनी केली आहे.