- May 11, 2023
- No Comment
वारजे ब्रिज खाली अनोळखी इसमाचे खुनाचा गुन्हा उघडकीस आणुन अज्ञात आरोपीस शोधुन पोलीसांनी ठोकल्या बेडया
वारजे माळवाडी कलम ३०२ हा दाखल गुन्हा वारजे माळवाडी
ब्रिज खाली पृथक ब-हाटेगार्डन मध्ये दिनांक ०६/०५/२०२३ रोजी रात्रौ ११/०० वा चे पुर्वी घडला आहे.गुन्ह्यांतील एक अनोळखी इसम हा वारजे ब्रिज खाली पृथक बराटे गार्डन मध्ये रक्ताचे थारोळ्यात
पडलेला असल्याची पोलीसांना खबर प्राप्त झाली होती. प्राप्त खबरी प्रमाणे वारजे माळवाडी पोलीस ठाणे कडील पोलीस अधिकारी व अंमलदार यांनी घटनास्थळी भेट देवुन वरिष्ठांचे मार्गदर्शनाखाली तपास केला असता सदरच्या अनोळखी इसमाचा अज्ञात कारणावरुन अज्ञात अनोळखी आरोपीने धारदार शस्त्राने गळ्यावर वारकरुन खुन केला असल्याचे आरोपीचे शवविच्छेदन अहवालावरुन निष्पन्न झाल आहे. सदर मयत इसमाची ओळख पटत नसल्याने मयत बॉडी शवागृहात ठेवण्यात आली होती.
सदर घटनेच्या घटनास्थळी वरिष्ठांनी व वारजे माळवाडी पोलीस ठाणे कडील तपास पथकाने भेट देवून मयताची ओळख पटवून कोणत्या कारणा साठी कोणी खुन केला आहे याबाबत तपास चालु केला. घटनास्थळी आजूबाजुस विचारपूस करुन माहिती घेतली असता मयत इसमाची ओळख पटवून त्याचे नाव अमरजीत जगन्नाथ गोयल, वय-५० वर्षे, रा. मेहूली, ता- बिनती, जि-फत्तेपुर, राज्य उत्तरप्रदेश. सध्या रा. वारजे ब्रिज जवळ, हॉटेल सागर परीसरात फुटपाथला, वारजे, पुणे असे असल्याचे समजुन आले. गुन्हयाचे अनुषंगाने कसुन तपास करताक् तपास पथकातील पोलीस अंमलदार अजय कामठे व बंटी मोरे यांना गोपनीय बातमीदारा मार्फत बातमी मिळाली की सदरचा गुन्हा हा राम श्रीमंत वाघमारे, वय – २० वर्षे, रा. वारजे ब्रिज खाली, हॉटेल सागर परीसरात फुटपाला, वारजे, पुणे मुळ रा. रत्नापुर पाटी, येरमाळा, ता-कळंब, जि- उस्मानाबाद याने जुन्या मोबाईल हॅन्डसेटचे पैसे न दिल्याचे कारणा वरुन केला असल्याची माहिती प्राप्त झाली होती.तसेच घटनास्थळावरील सीसीटीव्ही फुटेजची माहीती पोलीस अंमलदार अमोल राऊत यांनी प्राप्त केली.
सदर झाले तपासा वरुन रामनगर मार्शलवरील पोलीस अंमलदार राहुल कदम यांनी फिर्याद दिल्याने खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे दाखल गुन्हयातील अनोळखी आरोपीचा वरिष्ठांचे मार्गदर्शनाखाली तपास पथका मार्फत शोध घेण्यात आला. निष्पन्न अनोळखी आरोपीस शितापीने ताब्यात घेवून गुन्ह्यात अटक करण्यात
आली असून गुन्हा उघडकीस आणला आहे. दाखल गुन्ह्यांचा पुढील तपास सहा पोलीस निरीक्षक, रमेश बाबर, वारजे माळवाडी पोलीस ठाणे हे करीत आहेत.
सदरची कामगीरी ही मा. पोलीस आयुक्त, पुणे शहर, श्री. रितेश कुमार, मा. पोलीस सह आयुक्त, पुणे शहर श्री.संदिप कर्णिक, मा. अप्पर पोलीस आयुक्त, पश्चिम प्रादेशिक विभाग, पुणे शहर, श्री. प्रविण पाटील, मा.पोलीस उप-आयुक्त, परिमंडळ – ३, पुणे शहर श्री. सुहेल शर्मा, मा. सहा. पोलीस आयुक्त, कोथरुड विभाग, पुणे
शहर श्री सुनिल पवार यांचे मार्गदर्शनाखाली वारजे माळवाडी पोलीस ठाणेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक डी. एस. हाके, पोलीस निरीक्षक (गुन्हे) दत्ताराम बागवे, सपोनि रमेश बाबर, तपास पथकाचे पोलीस उपनिरीक्षक श्री नरेंद्र मुंढे, पोउपनि पार्वे, पोलीस अंमलदार रामदास गोणते, अमोल राऊत, अतुल भिंगारदिवे, बंटी मोरे, विजय
भुरूक,विक्रम खिलारी,नितीन कातुर्डे, अजय कामठे, श्रीकात भांगरे, योगेश वाघ यांनी केली आहे.