- May 11, 2023
- No Comment
रात्रीच्या वेळी पायी जाणा-या नागरिकांना मारहाण करुन जबरदस्तीने मोबाईल हिसकवणा-या चोरट्यांची टोळी जेरबंद
पोलीस अधिकारी व अंमलदार हद्दीत पेट्रोलींग करीत असताना, पोलीस अंमलदार अमोल पवार व निलेश साबळे यांना त्यांच्या बामतीदाराकडून बातमी मिळाली की, निखील साळुंखे, अथर्व अवघडे व प्रितम कांबळे यांनी मागील आठवड्यात पुणे शहरातील वेगवेगळ्या ठिकाणावरुन रस्त्याने येणारेजाणारे लोकांचे मोबाईल हॅन्डसेट जबरदस्तीने हिसकावुन घेतले आहेत. सदरचे मोबाईल ते विकण्यासाठी घेवुन चालले असुन, सध्या ते महात्मा फुले वाडा,
जवळ गंज पेठ, पुणे या ठिकाणी थांबलेले आहेत.त्या अनुशंगाने सदरची बातमी वरिष्ठांना कळविली असता, त्यांनी लागलीच सपोनि. आशिष कवठेकर व पोलीस अंमलदार यांची टीम तयार करुन त्यांना तशा सुचना व मार्गदर्शन करून बातमीचे ठिकाणी छापा टाकला
असता सदर इसम हे एका काळे रंगाचे पल्सर मोटर सायकला टेकुन कोणाचीतरी वाट पहात थांबलेले दिसले.
त्यांना लागलीच ताब्यात घेवुन त्यांचे नाव पत्ता विचारले असता, त्यांनी त्यांची नावे १) निखील गोपाळ साळुंखे, वय २० वर्षे, रा. घर नं. ४२६, गंज पेठ, लोहीया नगर, पुणे २) अथर्व अमर अवघडे, वय १९ वर्षे, रा.६३३, गंजपेठ, समाज मंदिरा जवळ, पुणे ३) प्रितम प्रदिप कांबळे, वय २२ वर्षे, रा. ५८५, गंजपेठ, पुणे असे असल्याचे सांगितले. सदर इसमांची झडती घेतली असता त्यांचेजवळ एका पिशवीत तीन मोबाईल हॅन्डसेट मिळुन आले. सदर मोबाईल बाबत त्यांचेकडे विचारपुस करता, त्यांनी सदरचे मोबाईल हे मोटर सायकलवरुन जावुन त्यांनी रस्त्याने जाणारे-येणारे लोकांकडुन जबरस्तीने हिसकावुन घेतले असल्याचे सांगितले. त्यापैकी एक मोबाईल हॅन्डसेट हा ट्राय मी या कपडयाच्या दुकाना समोर कस्तुरी चौक, पुणे येथे एका फोनवर बोलत चाललेल्या मुलाचे हातातुन हिसकावुन घेतला असल्याचे सांगितले.तसेच श्रीकृष्ण टॉकीज, ढमढेरे बोळ, बुधवार पेठ पुणे येथे आणखी दोन मोबाईल हॅन्डसेट हिसकावुन घेतला असल्याचे सांगितले. आरोपी यांचेक कडुन एक बजाज पल्सर मोटर सायकल व ०३ मोबाईल फोन असा एकुण १,२५,०००/- रु किंचा मुद्देमाल जप्त करुन, सदर आरोपींकडुन खडक व फरासखाना पोलीस स्टेशन कडील असे एकुण दोन जबरी
चोरीचे गुन्हे उघडकीस आणुन आरोपी व मुद्देमाल पुढिल कारवाईकामी संबंधीत पोलीस स्टेशनच्या ताब्यात देण्यात आलेले आहेत.
सदर आरोपी प्रितम प्रदिप कांबळे याचेवर यापुर्वी सहकारनगर पोलीस स्टेशन येथे खुनाचा प्रयत्न, मारामारी असे गुन्हे दाखल असुन, त्याचेवर ०२ वर्षा करीता तडीपार कारवाई करण्यात आली होती.
सदरची कामगिरी मा.पोलीस आयुक्त, पुणे ,श्री.रितेशकुमार,मा.सह पोलीस आयुक्त,पुणे शहर,श्री.संदिप कर्णिक,मा.अपर पोलीस आयुक्त, गुन्हे श्री रामनाथ पोकळे, मा. पोलीस उप-आयुक्त, गुन्हे, पुणे शहर, श्री. अमोल झेंडे,मा. सहाय्यक पोलीस आयुक्त, गुन्हे-१, पुणे शहर, श्री. सुनिल पवार यांचे मार्गदर्शनाखाली युनिट १ कडील वरिष्ठ पोलीस
निरीक्षक क्रांतीकुमार पाटील, शब्बीर सय्यद,सपोनि.आशिषकवठेकर, पोलीस अंमलदार, अमोल पवार, निलेश साबळे,इम्रानशेख,अय्याज दड्डीकर,आण्णा माने, शुभम देसाई, शंकर कुंभार यांनी केली आहे.