• May 11, 2023
  • No Comment

जुगाराचे व्यसनापोटी सराईत घरफोडी करणा-या आरोपीस व चोरीचा माल घेणारे सोनारास अटक करुन केला लाखो रुपये किंमताचा ऐवज केला जप्त

जुगाराचे व्यसनापोटी सराईत घरफोडी करणा-या आरोपीस व चोरीचा माल घेणारे सोनारास अटक करुन केला लाखो रुपये किंमताचा ऐवज केला जप्त

    यातील फिर्यादी,वय ५८ वर्षे, रा. सोपानबाग सोसायटी, घोरपडी, पुणे यांचे बंगल्याचे नुतनी करणाचे काम चालु असताना मार्च २०२३ मध्ये त्याचे राहते घरी अज्ञात चोरट्याने प्रवेश करुन कपाटाचे डिजीटल लॉकर उघडुन त्यातील सोने, चांदी, हिरे चे दागीने व फॉरेन करन्सी असा एकुण ४०,००,०००/-रु कि.चा ऐवज चोरुन नेला म्हणुन वानवडी पो.स्टे.गुन्हा नोंद आहे.मा. पोलीस आयुक्त, पुणे शहर यांनी सदरचा गंभीर गुन्हा उघडकीस आणणेबाबत आदेशित केले होते. वरिष्ठांचे आदेशान्वये दाखल गुन्हयाचा युनिट ५ गुन्हे शाखेकडुन तपास चालु असताना पुणे शहरातील १०० पेक्षा जास्तरेकॉर्डवरील गुन्हेगारांची तपासणी करणेत आली. तेव्हा युनिट कडील पथकास
    सदरचा गुन्हा हा रेकॉर्डवरील घरफोडी करणारा गुन्हेगार मुकेश बबन मुने वय २६ वर्षे रा.स.नं.१११,दत्त मंदिराजवळ, सुतारदरा, कोथरुड पुणे हा मिळुन येत नसल्याने त्याचे बाबत अधिक माहीती घेता तो भिवंडी ठाणे येथे राहणेस गेल्याचे समजले. त्याचा भिवंडी ठाणे येथे शोध घेतला असता तो व त्याचा मित्र नितीन सुरेश बागडे वय ३२ वर्षे रा. कवडे गल्ली, नालेगाव, अहमदनगर हे पुण्यातच असल्याचे समजले.

    त्यांचा शोध घेता.ते दोघे चंदननगर खराडी बायपास पुणे येथे मिळुन आले. त्यांना ताब्यात घेवुन चौकशी करता त्यांनी सदरचा गुन्हा केल्याचे कबुल करुन मुकेश मुने याने चोरलेले सोने नितीन बागडे याने त्याचे अहमदनगर येथील ओळखीचे सोनारांना विकल्याचे सांगीतले. त्या दोघांना दाखल गुन्हयात अटक करुन अहमदनगर येथे जावुन तेथील सोनारा कडुन १) ४२,०००/- कि. चे मोत्याचे मणी व पुष्कराज खडे २ ) १६,००,०००/-रुकि.रु.चे ३२४ ग्रॅम वजनाचे सोन्याचे लगडी व ३) ४,५०,०००/-रुकि.ची फॉरेन करन्सी (डॉलर व पाऊंड) असा एकुण २०,९२,०००/-रुकि. चा मुद्देमाल जप्त करणेत आलेला
    आहे.आरोपी मुकेश मुने यास ऑनलाईन बिंगो अॅपवर जुगार खेळण्याचा नाद असुन त्यामुळे त्याने घरफोडी चोरी करुन मिळालेले पैसे जुगारामध्ये हरलेला असल्याचे निष्पन्न झाले आहे. दाखल गुन्हयाचा तपास कृष्णा बाबर, सहायक पोलीस निरीक्षक युनिट ५ गुन्हे शाखा, पुणे शहर हे करीत आहेत. आरोपी मुकेश मुने हा घरफोडी करणारा रेकॉर्डवरील गुन्हेगार असुन त्याचेवर ३५ घरफोडीचे गुन्हे दाखल आहेत.
    सदरची कारवाई ही मा. पोलीस आयुक्त श्री रितेश कुमार, मा. पोलीस सह आयुक्त, श्री.संदीपकर्णिक, मा. अपर पोलीस आयुक्त, गुन्हे, श्री. रामनाथ पोकळे, मा. पोलीस उप आयुक्त,श्री. अमोल झेंडे,मा.सहायक पोलीस आयुक्त श्री नारायण शिरगांवकर, यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक उल्हास कदम, सहा, पो. निरी कृष्णा बाबर, अविनाश लोहोटे पोलीस अमंलदार, रमेश साबळे, प्रताप गायकवाड, विनोद शिवले,शशिकांत नाळे, अकबर शेख, दयाराम शेगर, राहुल ढमढेरे, प्रमोद टिळेकर, संजयकुमार दळवी यांनी केलेली आहे.

    Related post

    पवना नगरातील हॉटेलमध्ये दादागिरी; कर्मचाऱ्यांना धमक्या देत मोबाईलवर शूटिंग

    पवना नगरातील हॉटेलमध्ये दादागिरी; कर्मचाऱ्यांना धमक्या देत मोबाईलवर शूटिंग

    लोणावळा;पवना नगर परिसरातील एका हॉटेलमध्ये नुकतीच धक्कादायक घटना घडली. एक व्यक्ती आपल्या कुटुंबासह हॉटेलमध्ये आला होता. हॉटेल परिसरातील पाण्याच्या दिशेने जाणे…
    गुलटेकडी मार्केट यार्डमध्ये ग्राहकांची वर्दळ घटली; विक्रीअभावी भाजीपाला शिल्लक 

    गुलटेकडी मार्केट यार्डमध्ये ग्राहकांची वर्दळ घटली; विक्रीअभावी भाजीपाला शिल्लक 

    प्रतिनिधी : सचिन गाडे पुणे : शहरातील प्रमुख भाजीपाला घाऊक बाजार म्हणून ओळखल्या जाणाऱ्या गुलटेकडी मार्केट यार्डमध्ये सध्या ग्राहकांची संख्या मोठ्या…
    स्वारगेट पोलिसांच्या रेकॉर्डवरील तडीपार आरोपी जेरबंद; गुन्हे शाखा युनिट 2 ची कारवाई

    स्वारगेट पोलिसांच्या रेकॉर्डवरील तडीपार आरोपी जेरबंद; गुन्हे शाखा युनिट…

    पुणे: स्वारगेट पोलीस ठाण्याच्या रेकॉर्डवरील तडीपार आरोपी शाबीर महंमद शेख उर्फ शाहू (वय ३५, रा. इंदिरानगर झोपडपट्टी, गुलटेकडी, पुणे) याला गुन्हे…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *