• August 30, 2023
  • No Comment

पिंपरी चिंचवडमध्ये एका दुकानाला भीषण आग लागल्याची घटनाएकाच कुटुंबातील चार जणांचा होरपळून मृत्यू

पिंपरी चिंचवडमध्ये एका दुकानाला भीषण आग लागल्याची घटनाएकाच कुटुंबातील चार जणांचा होरपळून मृत्यू

    पिंपरी चिंचवड मधील चिखली भागात हृदय पिळवटून टाकणारी घटना घडली आहे. बुधवारी पहाटे येथील एका हार्डवेअरच्या दुकानाला भीषण आग लागली. या आगीत एकाच कुटुंबातील चार जणांचा होरपळून मृत्यू झाला आहे. पहाटे गाढ झोपेत असलेल्या कुटुंबाला स्वत:चा जीव वाचवण्यासही अवधी मिळाला नाही. आगीची माहिती मिळताच अग्निशमन दलाचे पथक घटनास्थळी दाखल झालं. आग नियंत्रणात आणली असून कुलिंगचं काम सुरू आहे.

    चिमणाराम चौधरी, ज्ञानुदेवी चौधरी, सचिन चौधरी (वय-१०) भावेश चौधरी (वय-१५) असं आगीत मृत पावलेल्यांची नावं आहे. संबंधित सर्वांचा आगीत होरपळून जागीच मृत्यू झाला आहे. बुधवारी पहाटे चिखली परिसरातील सचिन हार्डवेअर दुकानाला आग लागली. याच हार्डवेअर दुकानात चौधरी कुटुंब वास्तव्यास होतं. या आगीत एकाच कुटुंबातील चार जणांचा होरपळून मृत्यू झाल्याने परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे
    ही आग नेमकी कशी लागली? याची अधिकृत माहिती अद्याप समोर आली नाही. पण शॉटसर्किटमुळे ही आग लागली असावी, असा प्राथमिक अंदाज अग्निशमन दलाकडून वर्तवण्यात आला आहे

    Related post

    पवना नगरातील हॉटेलमध्ये दादागिरी; कर्मचाऱ्यांना धमक्या देत मोबाईलवर शूटिंग

    पवना नगरातील हॉटेलमध्ये दादागिरी; कर्मचाऱ्यांना धमक्या देत मोबाईलवर शूटिंग

    लोणावळा;पवना नगर परिसरातील एका हॉटेलमध्ये नुकतीच धक्कादायक घटना घडली. एक व्यक्ती आपल्या कुटुंबासह हॉटेलमध्ये आला होता. हॉटेल परिसरातील पाण्याच्या दिशेने जाणे…
    गुलटेकडी मार्केट यार्डमध्ये ग्राहकांची वर्दळ घटली; विक्रीअभावी भाजीपाला शिल्लक 

    गुलटेकडी मार्केट यार्डमध्ये ग्राहकांची वर्दळ घटली; विक्रीअभावी भाजीपाला शिल्लक 

    प्रतिनिधी : सचिन गाडे पुणे : शहरातील प्रमुख भाजीपाला घाऊक बाजार म्हणून ओळखल्या जाणाऱ्या गुलटेकडी मार्केट यार्डमध्ये सध्या ग्राहकांची संख्या मोठ्या…
    स्वारगेट पोलिसांच्या रेकॉर्डवरील तडीपार आरोपी जेरबंद; गुन्हे शाखा युनिट 2 ची कारवाई

    स्वारगेट पोलिसांच्या रेकॉर्डवरील तडीपार आरोपी जेरबंद; गुन्हे शाखा युनिट…

    पुणे: स्वारगेट पोलीस ठाण्याच्या रेकॉर्डवरील तडीपार आरोपी शाबीर महंमद शेख उर्फ शाहू (वय ३५, रा. इंदिरानगर झोपडपट्टी, गुलटेकडी, पुणे) याला गुन्हे…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *