• August 30, 2023
  • No Comment

हडपसर भागातील अमानोरा पार्क या उच्चभ्रू सोसायटीतील सदनिकेत सुरू असलेल्या जुगार अड्ड्यावर गुन्हे शाखेच्या सामाजिक सुरक्षा विभागाचा छापा

हडपसर भागातील अमानोरा पार्क या उच्चभ्रू सोसायटीतील सदनिकेत सुरू असलेल्या जुगार अड्ड्यावर गुन्हे शाखेच्या सामाजिक सुरक्षा विभागाचा छापा

    पुणे: हडपसर भागातील अमानोरा पार्क या उच्चभ्रू सोसायटीतील सदनिकेत सुरू असलेल्या जुगार अड्ड्यावर गुन्हे शाखेच्या सामाजिक सुरक्षा विभागाने छापा टाकला. या कारवाईत पोलिसांनी दहा जणांना ताब्यात घेतले. जुगाराचे साहित्य, हुक्क्याची सुगंधी तंबाखू, मोबाइल संच असा पाच लाख ७८ हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
    हडपसर भागातील अमानोरा पार्कमधील एका सदनिकेत काहीजण पैसे लावून जुगार खेळत असल्याची माहिती गस्त घालणाऱ्या गुन्हे शाखेच्या सामाजिक सुरक्षा विभागाला मिळाली. पोलिसांच्या पथकाने सापळा लावून सदनिकेत छापा टाकला. पोलिसांनी सदनिकेतून दहा जणांना ताब्यात घेतले. त्यांच्याकडून ४१ हजार रुपयांची रोकड, १४ हजार रुपयांची हुक्क्याची सुगंधी तंबाखू, जुगाराचे साहित्य असा पाच लाख ७८ हजारांचा मुद्देमाल जप्त केला. ताब्यात घेण्यात आलेल्या दहा जणांविरुद्ध महाराष्ट्र जुगार प्रतिबंधक कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला.
    सामाजिक सुरक्षा विभागाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक भरत जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक अनिकेत पोटे, राजेश माळेगावे, राजेंद्र कुमावत, तुषार भिवरकर, सागर केकाण, अमेय रसाळ, हणमंत कांबळे, संदीप कोळगे, अमित जमदाडे, किशोर भुजबळ आदींनी ही कारवाई केली

    Related post

    पवना नगरातील हॉटेलमध्ये दादागिरी; कर्मचाऱ्यांना धमक्या देत मोबाईलवर शूटिंग

    पवना नगरातील हॉटेलमध्ये दादागिरी; कर्मचाऱ्यांना धमक्या देत मोबाईलवर शूटिंग

    लोणावळा;पवना नगर परिसरातील एका हॉटेलमध्ये नुकतीच धक्कादायक घटना घडली. एक व्यक्ती आपल्या कुटुंबासह हॉटेलमध्ये आला होता. हॉटेल परिसरातील पाण्याच्या दिशेने जाणे…
    गुलटेकडी मार्केट यार्डमध्ये ग्राहकांची वर्दळ घटली; विक्रीअभावी भाजीपाला शिल्लक 

    गुलटेकडी मार्केट यार्डमध्ये ग्राहकांची वर्दळ घटली; विक्रीअभावी भाजीपाला शिल्लक 

    प्रतिनिधी : सचिन गाडे पुणे : शहरातील प्रमुख भाजीपाला घाऊक बाजार म्हणून ओळखल्या जाणाऱ्या गुलटेकडी मार्केट यार्डमध्ये सध्या ग्राहकांची संख्या मोठ्या…
    स्वारगेट पोलिसांच्या रेकॉर्डवरील तडीपार आरोपी जेरबंद; गुन्हे शाखा युनिट 2 ची कारवाई

    स्वारगेट पोलिसांच्या रेकॉर्डवरील तडीपार आरोपी जेरबंद; गुन्हे शाखा युनिट…

    पुणे: स्वारगेट पोलीस ठाण्याच्या रेकॉर्डवरील तडीपार आरोपी शाबीर महंमद शेख उर्फ शाहू (वय ३५, रा. इंदिरानगर झोपडपट्टी, गुलटेकडी, पुणे) याला गुन्हे…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *