• August 29, 2023
  • No Comment

युवकांना फसवणाऱ्या हडपसरच्या टोळी विरोधात लातुरात तिसरा गुन्हा दाखल

युवकांना फसवणाऱ्या हडपसरच्या टोळी विरोधात लातुरात तिसरा गुन्हा दाखल

पुणे:फायनान्स कंपनीच्या गाड्या स्वस्तात देतो म्हणून फसवणुक करणाऱ्या टोळीविरुद्ध लातुर मध्ये तिसरा गुन्हा दाखल. तक्रारदाराकडुन चारचाकीसाठी रक्कम घेवुन खोटी आश्वासन देउन चारचाकी व रक्कम परत न करता पाच लाख पस्तीस हजारांची मोठी फसवणूक केली असून,

पोलिसांनि दिलेल्या माहितीनुसार, तक्रार दार याच्या पुणे येथे राहणारा त्यांचा नातेवाईक गणेश कोरे याच्या ओळखीने नोव्हेंबर 2022 रोजी हाडपसर, पुणे येथे राहणारा प्रफुल्ल प्रभाकर उबाळे हा श्रीराम फायन्सास अँटोमॉल नसरापुर पुणे येथे एजंट म्हणुन काम करत असुन तो अलिशान गाड्या मधुन फिरत असतो. त्यामुळे तो फायनान्स मधुन गाड्या घेवुन गाड्या कमी किंमतीत विकतो असे कोरे याने सांगितले. व्यवहारासाठी हडपसर येथे सुभाष निवृत्ती रसाळ यांच्या गॅरेज च्या ऑफिसवर पोहोचले व तिथेच प्रफुल्ल उबाळे हा हजर होता. गणेश कोरे यांनी तक्रारदार यांची ओळख आरोपी प्रफुल्ल उबाळे यांच्याशी करून दिली व मला चार चाकी डिजायर पाहीजे याबाबत चर्चा केली.

तेव्हा आरोपी यांनी तक्रारदारास तुम्हाला पाहीजे असेल तर मोटारसायकलपण कमी किंमतीत देतो असे खोटे आश्वासन देऊन आरोपींच्या मोबाईल मध्ये बुलेटचा
फोटो दाखवला व त्यांची किंमत फक्त 65000/- रुपये आहे. असे सांगून ती मोटारसायकल आम्ही 50000/- रुपयेला देऊ शकतो. तक्रारदाराने त्वरीत प्रफुल्ल उबाळे याला त्यांचा फोनपे मोबाईल क्र. वर पाच हजार रुपये पाठवुन दिले.

तक्रारदार तेथेच दोन दिवस थांबुन मोटारसायकल बाबत विचारपुस केली असता त्यांनी गाडीचे कागदपत्र राहीले ते पुर्ण करुन देतो जर तुम्हाला भरोसा नसेल तर तुम्हाला तुमचे पैसे परत देतो म्हणुन दि. 28/12/2022 रोजी फोनपे द्वारे 50000 /- रुपये त्यांनी तक्रारदारास परत दिले त्यामुळे त्यांचावर विश्वास बसला.

त्याचदिवशी त्यांनी श्रीराम फायन्सास मध्ये गाड्या आहेत तुम्हाला दाखवतो मग त्याबाबत ठराव करु असे सांगुन त्याच वेळी तेथे एक व्यक्ती आला त्यांची ओळख प्रफुल्ल उबाळे यांनी करुन दिली व त्यांचे नाव सुभाष निवृत्ती रसाळ रा. हडपसर पुणे असे सांगुन हा माझा या गाड्या खरेदी विक्री धंद्यातील पाटनर आहे. असे सांगितले तसेच तेथे प्रफुल्ल उबाळे यांचा ड्रायव्हर अविनाश कदम रा.हडपसर पुणे हा पण होता तेव्हा सदर गाडी खरेदीच्या व्यवहारात पैसे पाठवायचे असतील तर ते पैसे तुम्ही प्रफुल्ल उबाळे यांचे खात्यात टाका म्हणुन त्यांचा खाते नंबर ड्रायव्हर ने तक्रारदारास लिहून दिला होता. व तक्रारदारास पुणे येथे मुक्काम करण्यास सांगितसे व उदया फायन्सांच्या गोडावुन मध्ये जाऊन तुम्हाला ती कार दाखवतो व नंतर व्यवहार ठरवुत असे सांगितल्याने तक्रारदार यांनी तेथेच मुक्काम केला व दुस-या दिवशी प्रफुल्ल उबाळे सोबत श्रीराम फायन्सास अँटोमॉल नसरापुर पुणे येथे सकाळी अंदाजे 11.00वा.सु येथे पोहोचले.तेव्हा तेथे आरोपी प्रफुल्ल उबाळे यांनी एक स्विफ्ट डिझायर कार दाखविली व तिची किंमत चार लाख पंच्चाहत्तर हजार रुपये आहे असे म्हणाला, तेव्हा बैठकीत ती कार 300000 (तीन लाख) रुपयाला तक्रारदारास विकली. आरोपींनी पैशा बाबत मागणी केली असता आता माझ्याकडे पैसे नाहीत लातुरला जाऊन तुमच्या आँकाऊटवर पैसे पाठवुन देतो असे म्हणुन तक्रारदार लातुरला परतले. लातुर येथुन बँक ऑफ बडोदा शाखा औसा रोड लातुर येथुन दि.29/11/2022रोजी प्रफुल्ल प्रभाकर उबाळे यांचे इंन्डुस्लँड बँक फातिमा नगर पुणे येथे त्यांचे आकाऊंटवर 210000 (दोन लाख दहा हजार) आरटीजीएस केले व माझे राजीवगांधी चौक लातुर येथील राज मोटार्स गॅरेजवर मी हजर असताना बाकी नव्वद हजार रुपये फोनपे वर प्रफुल्ल उबाळे यांना त्यांचा मोबाईल क्र. वर पाठवुन दिलेले आहे.

त्यानंतर त्यांनी श्रीराम फायन्सास नसरापुर पुणे येथुन डिझायर कार क्र- MH 14 EH 0084 ही तक्रारदारास दिली त्यावेळी तेथे त्यांचा ड्रायव्हर अविनाश कदम हा पण हजर होता व त्यांनी गाडीचे पुर्ण कागदपत्र नंतर देतो म्हणुन त्या गाडीचे गेट पास अविनाश कदम यांचे नावे काढुन तक्रारदारास दिले. तेथुन ती कार घेवुन तक्रारदार लातुरला परतले. व त्यानंतर तिस-या दिवशी प्रफुल्ल उबाळे यांचा फोन आला गाडीचे पेपर तयार आहेत तसेच दुसरी एक ब्रिजा कार चांगल्या कंडीशन मध्ये आहे. असे म्हणुन त्यांनी त्या ब्रिजाकार चा फोटो तक्रारदारास वॉटसअॅप वर पाठवला तक्रारदारास ती कार पसंद पडली. व त्या कार चा सौदा त्यांनी सहा लाख रुपये मध्ये देतो सांगुन तेव्हा ती कार तक्रारदारांनी पाच लाख पस्सतीस हजार रुपयला मागीतली तेव्हा आरोपींनी होकार दिला.व पैसे आँकाऊट वर पाठवुन द्या असे सांगुन दि. 03/12/2022 रोजी प्रफुल्ल प्रभाकर उबाळे यांचे इंन्डुस्लँड बँक फातिमा नगर पुणे येथे त्यांचे अकाऊंटवर चार लाख दहा हजार आरटीजीएस केले व बाकी एक लाख पंच्चवीस हजार रुपये फोनपे वर आरोपी प्रफुल्ल उबाळे याला त्याच्या मोबाईल वर पाठवुन दिले. त्यानंतर तक्रारदार डिजाझर व ब्रिजा कार चे कागदपत्र घेण्यासाठी पुण्याला आले असता तेव्हा तेथे आरोपी प्रफुल्ल उबाळे भेटला नाही म्हणुन त्यांचा बिजनेस पाटनर सुभाष रसाळ यांच्या गॅरेजवर कम ऑफिसवर तक्रारदार व गणेश कोरे गेले असता तेथे आरोपी भेटला नाही पण सुभाष रसाळ हा होता, त्यांना सदर प्रकार सांगितला प्रफुल्ल उबाळे यांची विचारपुस केली असता रसाळ यांनी यातील मला काही माहीती नाही परत इकडे यायचे नाही जर आलात तुमच्यावर अँटरासिटीचे गुन्हे दाखल करु असे म्हणुन शिवीगाळ करुन जिवे मारण्याची धमकी दिली.

त्यानंतर तक्रारदारांनी वेळोवेळी प्रफुल्ल उबाळे याला फोन केला. कुठलाच प्रतिसाद न देता आरोपी उबाळे याने तक्रारदार यांचा नंबर ब्लॉक लिस्ट मध्ये टाकला होता. त्यावरुन तक्रारदार यांना त्यांची मोठी फसवणुक झाल्याचे लक्षात आले. तरी दि. 15/11/2022ते 15/03/2023 च्या दरम्यान हडपसर पुणे येथे आरोपी नामे प्रफुल्ल प्रभाकर उबाळे यांनी श्रीराम फायन्सासचे एक एजंट म्हणुन मार्केट वॅल्युव पेक्षा निम्म्या किंमतीत मोटारसायकल, कार तक्रारदारास विकत देवुन त्यांचा विश्वास संपादन करुन त्यांना आजुन एक कार कमी किंमतीत देण्याचे आमीष दाखवुन त्यांना ती कार न तक्रारदाराकडुन 535000/- रुपये (पाच लाख पस्सतीस हजार ) रुपयाची फसवणुक केली व डिझायर कार चे मालकीचे कागदपत्र आज पर्यंत दिले नाही.

तक्रारदार पैसे व कारचे कागदपत्र मागण्यासाठी रसाळ यांच्या हडपसर पुणे येथील गॅरेजवर 15 मार्च 2023 मध्ये सकाळी अंदाजे 11.30वा गेले असता तेथे 1. प्रफुल्ल उबाळे 2. सुभाष रसाळ 3. अविनाश कदम यांनी मिळुन तक्रारदारावरच खोटा अट्रोसिटीची गुन्हा दाखल करेन व पुन्हा आलास तर जीवे मारण्याची धमकी दिली व तुला जिवंत जायचे आहे काय? लातुरला तु परत पुण्याला यायचे नाही तुझे पैसे कार याबाबत आम्हाला काहीही विचाराचे नाही असा दम दिला.

Related post

खुनाच्या गुन्ह्यातील आरोपीस जामीन मंजूर 

खुनाच्या गुन्ह्यातील आरोपीस जामीन मंजूर 

    पुणे; खून प्रकरणात कलम ३०२, २०१ आरोपी गुन्हा कबुलीचे निवेदन असताना आरोपी नामे अब्दुला उर्फ बबलू सरदार यास जिल्हा…
मित्राबरोबर फिरायला बोपदेव घाटात गेलेल्या  तरुणीवर रात्री गँगरेप

मित्राबरोबर फिरायला बोपदेव घाटात गेलेल्या तरुणीवर रात्री गँगरेप

लुटमारीच्या घटना कायम होत असतात, परंतु मित्रासोबत फिरायला गेलेल्या एका महिलेवर तिन जणांनी बलात्कार केल्याची गंभीर घटना काल रात्री घडली. या…
घरफोडी करणारा अट्टल गुन्हेगार जेरबंद ! घरफोडीचे ०३ गुन्हे उघड गुन्हे शाखा युनिट ६ ची कारवाई

घरफोडी करणारा अट्टल गुन्हेगार जेरबंद ! घरफोडीचे ०३ गुन्हे…

गुन्हे शाखा युनिट-६ कडील पथक युनिट हद्दीत गुन्हे प्रतिबंधात्मक व गुन्हेगार चेकिंग पेट्रोलिंग करित असताना युनिटकडील अंमलदारास मिळालेल्या गुप्त बातमी वरुन…

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *