• August 29, 2023
  • No Comment

बी. टी. कवडे रोडवरील किराणा मालाच्या दुकानातील कॅश चोरणारे दोघेजण अखेर जेरबंद

बी. टी. कवडे रोडवरील किराणा मालाच्या दुकानातील कॅश चोरणारे दोघेजण अखेर जेरबंद

     

    मुंढवा पोलीस ठाणे हददीत वठारे मळा या ठिकाणी असलेल्या फिर्यादी यांचे दुकानातील रोख रक्कम ही फिर्यादी हे दुकानाबाहेर गेले असताना त्यांचे काउंटर मधुन अज्ञात आरोपींनी चोरुन नेलेबाबत मुंढवा पोलीस ठाणे येथे गुर नं २४४/२०२३ भा. द. वी ३८०, ३४ प्रमाणे गुन्हा दाखल झाला होता. सदर गुन्हयाचा तपासाचे पुढील आदेश मुंढवा पोलीस ठाणेचे वरीष्ठ पोलीस निरीक्षक श्री विष्णु ताम्हाणे यांनी तपास पथक प्रमुख श्री संदीप जोरे व टिम यांनी दिल्याने सदर टीम चोरी झालेल्या दुकानातील सीसीटीव्ही व दुकानासमोरील रोडवरील सीसीटीव्ही च्या माध्यमातुन अज्ञात आरोपीचा तपास करीत होते. जवळजवळ ५० सीसीटीव्ही चा तपास करुन अखेर पोलीसांना सदर अज्ञात आरोपी पर्यत पोहचण्यात यश आले असुन आरोपींनी गुन्हयाची कबुली दिली असुन त्यांचेकडुन गुन्हयात चोरलेली रक्कमजमा करण्यात आली आहे. अटक केलेल्या आरोपीची नावे १ ) चंद्रकांत राजु जाधव वय २४ वर्षे २ ) राहुल
    इश्वर सितापुरे वय २९ वर्षे दोघे रा सर्वोदय कॉलनी मुंढवा असे आहेत. वरील अटक आरोपींकडे अधिक
    तपास चालु आहे.

    सदरची कामगीरी मा. अपर पोलीस आयुक्त पुर्व प्रादेशीक विभाग पुणे श्री. रंजनकुमार शर्मा मा.पोलीस उप-आयुक्त परिमंडळ ५ पुणे शहर श्री. विक्रांत देशमुख, मा. सहा. पोलीस आयुक्त, हडपसर विभागपुणे शहर श्रीमती अश्विनी राख यांचे मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री विष्णु ताम्हाणे मुंढवापोलीस ठाणे पुणे, प्रदिप काकडे, पोलीस निरीक्षक (गुन्हे), मुंढवा पोलीस ठाणे पुणे तपास पथकाचेसहा. पोलीस निरीक्षक संदिप जोरे, दिनेश राणे दिनेश भांदुर्गे, महेश पाठक, वैभव मोरे, राहुल मोरे सचिन
    पाटील व स्वप्नील रासकर यांनी केली आहे.

    Related post

    पवना नगरातील हॉटेलमध्ये दादागिरी; कर्मचाऱ्यांना धमक्या देत मोबाईलवर शूटिंग

    पवना नगरातील हॉटेलमध्ये दादागिरी; कर्मचाऱ्यांना धमक्या देत मोबाईलवर शूटिंग

    लोणावळा;पवना नगर परिसरातील एका हॉटेलमध्ये नुकतीच धक्कादायक घटना घडली. एक व्यक्ती आपल्या कुटुंबासह हॉटेलमध्ये आला होता. हॉटेल परिसरातील पाण्याच्या दिशेने जाणे…
    गुलटेकडी मार्केट यार्डमध्ये ग्राहकांची वर्दळ घटली; विक्रीअभावी भाजीपाला शिल्लक 

    गुलटेकडी मार्केट यार्डमध्ये ग्राहकांची वर्दळ घटली; विक्रीअभावी भाजीपाला शिल्लक 

    प्रतिनिधी : सचिन गाडे पुणे : शहरातील प्रमुख भाजीपाला घाऊक बाजार म्हणून ओळखल्या जाणाऱ्या गुलटेकडी मार्केट यार्डमध्ये सध्या ग्राहकांची संख्या मोठ्या…
    स्वारगेट पोलिसांच्या रेकॉर्डवरील तडीपार आरोपी जेरबंद; गुन्हे शाखा युनिट 2 ची कारवाई

    स्वारगेट पोलिसांच्या रेकॉर्डवरील तडीपार आरोपी जेरबंद; गुन्हे शाखा युनिट…

    पुणे: स्वारगेट पोलीस ठाण्याच्या रेकॉर्डवरील तडीपार आरोपी शाबीर महंमद शेख उर्फ शाहू (वय ३५, रा. इंदिरानगर झोपडपट्टी, गुलटेकडी, पुणे) याला गुन्हे…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *