• August 29, 2023
  • No Comment

आई पासून १५ कि.मी. दुरावलेल्या लहान मुलाचे सोशल मिडीया, पोलीस शोध यंत्रणाचे माध्यमाने आईचा ०२ तासात घेतला शोध

आई पासून १५ कि.मी. दुरावलेल्या लहान मुलाचे सोशल मिडीया, पोलीस शोध यंत्रणाचे माध्यमाने आईचा ०२ तासात घेतला शोध

 

मुंढवा ब्रिज परिसरात ०८ वर्षाचा मुलगा एकटाच अनवानी अस्वस्थ भटकत असून तो रडत असल्याने रोडने जाणा-या चालक नामे अतिश विठ्ठल जगदाळे, वय २८ वर्षे, साईनाथ नगर वडगाव शेरी, पुणे यांनी त्यास मुंढवा पोलीस ठाण्यात सुरक्षिततेच्या दृष्टीने घेवून आले.त्यांनी सदर मुलास ठाणे अंमलदार सहा पोलीस फौजदार, होले यांचे ताब्यात दिले. होले यांनी त्यांचे मदतीस असलेल्या महिला अंमलदार उमा चोरघे यांचे मदतीने मुलाकडे प्रेमाने विचारपुस केली. परंतू
त्यास काहीएक सांगता येत नसल्याने त्यास वरिष्ठ पोलीस निरीक्षक, विष्णू ताम्हाणे यांचेसमोर नेले.सदर घटनेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक, विष्णू ताम्हाणे यांनी गाभीर्यपूर्वक दखल घेवून तात्काळत्याचे आई-वडील व नातेवाईक यांचा शोध घेणे करीता पोलीस अंमलदार मुंढवा बिट मार्शलवरील पोलीस अंमलदर सचिन मेमाणे, संदीप गर्जे यांना मुंढवा चौक, खराडी ब्रिज भागातील लेबर कॅम्प, बिगारी,
पथारीवाले, फुगे विक्रेते यांना फोटो दाखवून खात्री करणे बाबत सुचना दिल्या. तसेच त्याप्रमाणे नागरिक,पोलीस, पत्रकार अशा व्हॉटस्अप ग्रुपवर सदरचा मुलागा मिळून आला असले बाबत त्याचे आई-वडीलांचाशोध होणेकामी ब्रॉडकास्ट करण्यात आला.
सदरचा मुलगा भारती विद्यापीठ, कात्रज चौक भागातील असल्याची माहिती मिळाल्याने त्याचे पालकास मुंढवा पोलीस ठाणे येथे बोलावून घेतले. पोलीसांचे शोध मोहीम व पोलीस चौकस यंत्रणेचा योग्यवापर करुन अंदाजे दोन तासांनी सदर मुलाचे आई वडीलांचा शोध घेणेस पोलीसांना यश मिळाले.सदर मुलाचे नाव संजय पवार, वय ०८ वर्षे, रा. भारती विद्यापीठ, कात्रज, पुणे चौकातील अंत्यत
गरीब कुटूंबातील फुटपाथवर राहून फुगे व इतर वस्तूंची विक्री करणाऱ्या लोकांचा असल्याचे समोर आले.सदर मुलास त्याची आई आशा पवार, रा. सदर यांचे ताब्यात देण्यात आले आहे. याबाबत सदरपरिसरातील नागरिकांनी पोलीसांचे या तत्पर कामगिरी बद्ल कौतुक केले आहे.सदरची कामगिरी, मा.पोलीस उप-आयुक्त, परिमंडळ – ५ पुणे शहर, श्री. विक्रांत देशमुख मा. सहा.
पोलीस आयुक्त, हडपसर विभाग पुणे शहर श्रीमती आश्विनी राख, यांच्या मार्गदर्शनाखाली, मुंढवा पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक, श्री विष्णू ताम्हाणे यांचे सुचानाप्रमाणे पोलीस उप-निरीक्षक, अश्विनी भोसले,सहा पोलीस फौजदार, होले, पोलीस अंमलदार, सचिन मेमाणे, नवनाथ कोकरे, उमा चोरघे, आरती जमाले वइतर स्टाफ यांनी केली आहे.

Related post

खुनाच्या गुन्ह्यातील आरोपीस जामीन मंजूर 

खुनाच्या गुन्ह्यातील आरोपीस जामीन मंजूर 

    पुणे; खून प्रकरणात कलम ३०२, २०१ आरोपी गुन्हा कबुलीचे निवेदन असताना आरोपी नामे अब्दुला उर्फ बबलू सरदार यास जिल्हा…
मित्राबरोबर फिरायला बोपदेव घाटात गेलेल्या  तरुणीवर रात्री गँगरेप

मित्राबरोबर फिरायला बोपदेव घाटात गेलेल्या तरुणीवर रात्री गँगरेप

लुटमारीच्या घटना कायम होत असतात, परंतु मित्रासोबत फिरायला गेलेल्या एका महिलेवर तिन जणांनी बलात्कार केल्याची गंभीर घटना काल रात्री घडली. या…
घरफोडी करणारा अट्टल गुन्हेगार जेरबंद ! घरफोडीचे ०३ गुन्हे उघड गुन्हे शाखा युनिट ६ ची कारवाई

घरफोडी करणारा अट्टल गुन्हेगार जेरबंद ! घरफोडीचे ०३ गुन्हे…

गुन्हे शाखा युनिट-६ कडील पथक युनिट हद्दीत गुन्हे प्रतिबंधात्मक व गुन्हेगार चेकिंग पेट्रोलिंग करित असताना युनिटकडील अंमलदारास मिळालेल्या गुप्त बातमी वरुन…

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *