- August 29, 2023
- No Comment
पोलीस अधिकारी व पोलीस अंमलदार यांचेमध्ये उत्साह निर्माण करून,मनोबल निर्माण करण्यासाठी कार्यशाळा आयोजीत केलेबाबत
मा.पोलीस आयुक्त, पुणे शहर, मा. सह पोलीस आयुक्त पुणे शहर, मा.अपरपोलीस आयुक्त, पश्चिम प्रादेशिक विभाग, पुणे शहर यांचे मार्गदर्शनाखाली मा श्रीमती स्मार्तना पाटील, पोलीस उप आयुक्त, परिमंडळ – २, पुणे शहर यांचे कल्पनेतून परिमंडळ-२ मधील पोलीस अधिकारी व पोलीस अंमलदार यांची कार्यशाळा आयोजीत करण्यातआली होती.
सदरच्या कार्यशाळेत प्रमुख वक्ते श्री राजेंद्र भिडे यांनी ‘संवाद कौशल्य श्रीमती सीमा देसाई-नायर यांनी ‘मनाची भाषा’ व ‘न्युरोल्यूजेस्टीक’ चे दैनंदिन जीवनातील फायदे व श्री. नारायण शिरगावकर, सहा. पोलीस आयुक्त, स्वारगेट विभाग, पुणे शहर यांनी ‘समज गैरसमज तसेच डॉ. दत्ता कोहीनकर यांनी ‘तणावमुक्त’ जीवन या विषयावर
उत्तमप्रकारे मार्गदर्शन करून, सहभागी पोलीस अधिकारी व अंमलदार यांचेमध्ये तणाव मुक्ती करून, दैनंदीन जीवनात उत्साह निर्माण करण्याचा प्रयत्न केला. तसेच मा.
श्रीमती. स्मार्तना पाटील, (भापोसे), पोलीस आयुक्त, परिमंडळ-२, पुणे शहर यांनी उपस्थित अधिकारी व अंमलदार यांच्या अडचणी व सुचना ऐकून त्या सोडविण्याचा
प्रयत्न करून, त्यांच्यातील आत्मविश्वास, मनोबल वाढविण्यासाठी चांगल्या प्रकारे मार्गदर्शन केले.
सदर कार्यक्रमाचे आयोजन स्वारगेट पोलीस विभागाचे सहा पोलीस आयुक्त, श्री. नारायण शिरगावकर, श्री. सुनिल झावरे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक, स्वारगेट पोलीस स्टेशन,
श्री.सोमनाथ जाधव, पोलीस निरीक्षक, गुन्हे स्वारगेट पोस्टे, स्वारगेट पोस्टे कडील सपोनि.संदे, सपोनि. काकरे, सपोनि. अश्विनी बावचे, पोलीस उप निरीक्षक श्रीमती राजश्री
पाटील, श्रीमती.किर्ती चाटे, पोलीस उप-निरीक्षक, येवले व स्वारगेट पोस्टे कडील सर्व पोलीस अंमलदार यांनी विशेष परिश्रम घेवून सहभाग नोंदविला. त्याचप्रमाणे परिमंडळ-२
विभागातील एकूण १६ पोलीस अधिकारी व ११२ पोलीस अंमलदार यांनी देखील सदर कार्यशाळेमध्ये सहभागी होवून प्रोहत्सान दिले. सदर कार्यक्रमाचे सुत्रसंचालन सहा पोलीस निरीक्षक, अश्विनी बावचे, स्वारगेटपोस्टे पुणे शहर यांनी केले.