• August 30, 2023
  • No Comment

पुणे शहरातील राहुल शेंडगे टोळीतील ११ जणांवर मोकांतर्गत कारवाई

पुणे शहरातील राहुल शेंडगे टोळीतील ११ जणांवर मोकांतर्गत कारवाई

    पुणे – टिंबर मार्केटमध्ये तरुणावर कोयत्याने वार करून नागरिकांमध्ये दहशत निर्माण करणाऱ्या राहुल शेंडगे टोळीतील अकराजणांवर पोलिसांनी महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण (मोका) कायद्यान्वये कारवाई केली. या आरोपींवर खुनाचा प्रयत्न, दुखापत करणे, घातक शस्त्र बाळगणे असे गंभीर स्वरुपाचे गुन्हे दाखल आहेत
    राहुल दत्तू शेंडगे (वय २१), करण ऊर्फ ठोंब्या भानुदास आगलावे (वय २१), लखन भानुदास आगलावे (वय २२), शंकर अण्णा कोंगाडी (वय २५) आणि रोहन दत्तू शेंडगे (वय २४, सर्व रा. लोहियानगर), महेश इंद्रजित आगलावे (वय २४, रा. आंबेडकरनगर, मार्केटयार्ड), विशाल ऊर्फ लल्ल्या ऊर्फ लक्ष्मण भारत पारधे (वय २१, रा. पीएमसी कॉलनी, गंजपेठ) यांना अटक केली आहे. तर या गुन्ह्यातील एका अल्पवयीन मुलासह तिघेजण अद्याप फरार आहेत.पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, टिंबर मार्केटमध्ये टोळी प्रमुख राहुल शेंडगे आणि त्याच्या साथीदारांनी ‘माझ्या भावाला का मारले,’ असे विचारत एका तरुणावर कोयत्याने वार करून मित्रांना मारहाण केली. याबाबत खडक पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला होता. या टोळीवर गंभीर गुन्हे दाखल आहेत.
    त्यामुळे पोलिस आयुक्त रितेश कुमार यांनी या टोळीवर मोकांतर्गत कारवाईचे आदेश दिले होते. त्यानुसार खडक पोलिस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक सुनील माने यांनी मोकाचा प्रस्ताव पोलिस उपायुक्त संदीपसिंग गिल यांच्यामार्फत पाठविला. अतिरिक्त पोलिस आयुक्त प्रवीणकुमार पाटील यांनी मोकाच्या कारवाईस मंजुरी दिली.

    Related post

    पवना नगरातील हॉटेलमध्ये दादागिरी; कर्मचाऱ्यांना धमक्या देत मोबाईलवर शूटिंग

    पवना नगरातील हॉटेलमध्ये दादागिरी; कर्मचाऱ्यांना धमक्या देत मोबाईलवर शूटिंग

    लोणावळा;पवना नगर परिसरातील एका हॉटेलमध्ये नुकतीच धक्कादायक घटना घडली. एक व्यक्ती आपल्या कुटुंबासह हॉटेलमध्ये आला होता. हॉटेल परिसरातील पाण्याच्या दिशेने जाणे…
    गुलटेकडी मार्केट यार्डमध्ये ग्राहकांची वर्दळ घटली; विक्रीअभावी भाजीपाला शिल्लक 

    गुलटेकडी मार्केट यार्डमध्ये ग्राहकांची वर्दळ घटली; विक्रीअभावी भाजीपाला शिल्लक 

    प्रतिनिधी : सचिन गाडे पुणे : शहरातील प्रमुख भाजीपाला घाऊक बाजार म्हणून ओळखल्या जाणाऱ्या गुलटेकडी मार्केट यार्डमध्ये सध्या ग्राहकांची संख्या मोठ्या…
    स्वारगेट पोलिसांच्या रेकॉर्डवरील तडीपार आरोपी जेरबंद; गुन्हे शाखा युनिट 2 ची कारवाई

    स्वारगेट पोलिसांच्या रेकॉर्डवरील तडीपार आरोपी जेरबंद; गुन्हे शाखा युनिट…

    पुणे: स्वारगेट पोलीस ठाण्याच्या रेकॉर्डवरील तडीपार आरोपी शाबीर महंमद शेख उर्फ शाहू (वय ३५, रा. इंदिरानगर झोपडपट्टी, गुलटेकडी, पुणे) याला गुन्हे…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *