• August 30, 2023
  • No Comment

परदेशात नोकरीचे आमिष; १२ लाखांना लुबाडले

परदेशात नोकरीचे आमिष; १२ लाखांना लुबाडले

    पुणे- परदेशातील कंपनीत नोकरीचे आमिष दाखवून एका व्यक्तीची १२ लाख रुपयांची फसवणूक केल्याचा प्रकार समोर आला आहे. सायबर पोलिसांनी कौशल्यपूर्ण तपास करून आरोपीला हरियानातील गुडगाव येथून अटक केली. आरोपीकडून लॅपटॉप, तीन मोबाईल संच आणि १२ लाखांची रोकड हस्तगत केली आहे.

    याबाबत एका व्यक्तीने पुणे सायबर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. जयंतकुमार परमानंद मलिक (वय-२९, रा. पालमविहार, गुडगाव, हरियाना) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शालिनी शर्मा आणि करण सिंग नावाच्या व्यक्तींनी मोबाईलवरून फिर्यादीशी संपर्क साधला.ते एका सल्लागार कंपनीत काम करीत असल्याचे सांगितले. त्यानंतर त्यांनी फिर्यादीला इ-मेल पाठविला. त्यात परदेशातील एका कंपनीत वरिष्ठ महाव्यवस्थापक पदावर नोकरी मिळवून देतो, असे सांगून शर्मा आणि सिंग यांनी त्यांना लिंक पाठवली.फिर्यादीने त्यांना लिंकवरून ११ लाख ९१ हजार रुपये पाठविले. परंतु नोकरी न मिळाल्याने आर्थिक फसवणूक झाल्याचे लक्षात आले. त्यावर त्यांनी १८ जुलै रोजी सायबर पोलिस ठाण्यात तक्रार दिली. याबाबत सायबर पोलिसांनी गुन्हा दाखल करून तपास सुरू केला.
    आरोपींनी गुन्ह्यात वापरलेले मोबाईल क्रमांक, ईमेल आयडी, पैसे पाठविण्यासाठी दिलेली लिंक आणि बँक खात्यांचा तांत्रिक तपास केला. त्यात आरोपी दिल्ली आणि गुडगाव येथील असल्याचे निष्पन्न झाले. त्यानुसार आर्थिक व सायबर गुन्हे शाखेचे पोलिस उपायुक्त श्रीनिवास घाडगे आणि वरिष्ठ पोलिस निरीक्षक मीनल सुपे पाटील यांनी पोलिसांचे पथक दिल्ली, हरियाना येथे पाठविले. या पथकाने आरोपी मलिक याला गुडगाव येथून अटक केली.न्यायालयाने आरोपीला २९ ऑगस्टपर्यंत पोलिस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले. त्यानंतर आरोपीची न्यायालयीन कोठडीत रवानगी करण्यात आल्याची माहिती वरिष्ठ निरीक्षक सुपे-पाटील यांनी दिली.

    Related post

    पुणे कृषी उत्पन्न बाजार समितीच्या उपसभापतीपदी मनीषा हरपळे यांची बिनविरोध निवड

    पुणे कृषी उत्पन्न बाजार समितीच्या उपसभापतीपदी मनीषा हरपळे यांची…

    प्रतिनिधी : सचिन गाडे पुणे : कृषी उत्पन्न बाजार समिती, पुणे येथील उपसभापतीपदी मनीषा हरपळे यांची गुरुवारी (दि. 23) बिनविरोध निवड…
    समाजासाठी मोठं हृदय – कालिदास ढमढेरे यांची ५ लाखांची देणगी

    समाजासाठी मोठं हृदय – कालिदास ढमढेरे यांची ५ लाखांची…

    भीमनगर येथील गो-हे खुर्द येथे समाज मंदिराच्या उद्घाटन सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर एक प्रेरणादायी घटना घडली आहे. स्थानिक उद्योजक मा. श्री. कालिदास (दादा)…
    गुलटेकडी मार्केटयार्ड अडते असोसिएशन निवडणुकीत ८०१ मतदार मतदानाचा हक्क बजावणार

    गुलटेकडी मार्केटयार्ड अडते असोसिएशन निवडणुकीत ८०१ मतदार मतदानाचा हक्क…

    प्रतिनिधी : सचिन गाडे पुणे: गुलटेकडी येथील श्री छत्रपती शिवाजी मार्केटयार्ड अडते असोसिएशनच्या निवडणुकीत यंदा एकूण ८०१ मतदार मतदानाचा हक्क बजावणार…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *