• September 7, 2023
  • No Comment

पुण्‍यातील टिळक रस्त्यावर स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या तरुणावर कोयत्याने वार

पुण्‍यातील टिळक रस्त्यावर स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या तरुणावर  कोयत्याने वार

    पुणे : पुण्‍यातील टिळक रस्त्यावर स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या तरुणावर तिघांनी कोयत्याने वार केले. आज पहाटे ही घटना घडली आहे. या प्रकरणी तीन आरोपींना विश्रामबाग पोलिसांनी पानमळा परिसरातून अटक केली आहे. गुन्हा घडल्यापासून अवघ्या दोन तासांत आरोपींना पोलिसांनी अटक केली आहे. याबाबत विश्रामबाग पोलीस ठाण्यात खूनाचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
    या प्रकरणी तरुणाने पोलिसांत तक्रार दाखल केली आहे. तक्रारदार आणि त्याचे मित्र पुण्यातील सदाशिव पेठेतील अभ्यासिकेतून घरी जात असताना शक्ती स्पोर्टच्या समोर तीन जण दुचाकीवरुन आले आणि या मुलांना अडवलं आणि शर्टाची कॉलर पकडून त्यांच्यावर कोयत्याने हल्ला करण्याचा प्रयत्न केला. हा सगळा प्रकार रात्री दोन वाजता घडला. हल्ला करणाऱ्यांना पुणे पोलिसांनी काही तासांतच बेड्या ठोकल्या आहेत. या सगळ्या हल्लेखोराचं वय 25 ते 26 दरम्यान आहे. या घटनेमुळे पुण्यात पुन्हा एकदा कोयता गॅंगची दहशत पाहायला मिळाली

    Related post

    पवना नगरातील हॉटेलमध्ये दादागिरी; कर्मचाऱ्यांना धमक्या देत मोबाईलवर शूटिंग

    पवना नगरातील हॉटेलमध्ये दादागिरी; कर्मचाऱ्यांना धमक्या देत मोबाईलवर शूटिंग

    लोणावळा;पवना नगर परिसरातील एका हॉटेलमध्ये नुकतीच धक्कादायक घटना घडली. एक व्यक्ती आपल्या कुटुंबासह हॉटेलमध्ये आला होता. हॉटेल परिसरातील पाण्याच्या दिशेने जाणे…
    गुलटेकडी मार्केट यार्डमध्ये ग्राहकांची वर्दळ घटली; विक्रीअभावी भाजीपाला शिल्लक 

    गुलटेकडी मार्केट यार्डमध्ये ग्राहकांची वर्दळ घटली; विक्रीअभावी भाजीपाला शिल्लक 

    प्रतिनिधी : सचिन गाडे पुणे : शहरातील प्रमुख भाजीपाला घाऊक बाजार म्हणून ओळखल्या जाणाऱ्या गुलटेकडी मार्केट यार्डमध्ये सध्या ग्राहकांची संख्या मोठ्या…
    स्वारगेट पोलिसांच्या रेकॉर्डवरील तडीपार आरोपी जेरबंद; गुन्हे शाखा युनिट 2 ची कारवाई

    स्वारगेट पोलिसांच्या रेकॉर्डवरील तडीपार आरोपी जेरबंद; गुन्हे शाखा युनिट…

    पुणे: स्वारगेट पोलीस ठाण्याच्या रेकॉर्डवरील तडीपार आरोपी शाबीर महंमद शेख उर्फ शाहू (वय ३५, रा. इंदिरानगर झोपडपट्टी, गुलटेकडी, पुणे) याला गुन्हे…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *