• September 7, 2023
  • No Comment

चेष्टामस्करीचा राग आल्याने तरूणाच्या डोक्यात लोखंडी शस्त्राने वार

चेष्टामस्करीचा राग आल्याने तरूणाच्या डोक्यात लोखंडी शस्त्राने वार

    पुणे : गप्पा मारत उभे असताना एका २५ वर्षीय तरूणाच्या चेष्टामस्करीचा राग आल्याने तिघांनी त्याच्या डोक्यात लोखंडी शस्त्राने वार करत मारून टाकण्याचा प्रयत्न केला. याप्रकरणी हनुमंत सोमनाथ शिंदे (२५, रा. संदेशनगर, मार्केटयार्ड) याने मार्केटयार्ड पोलिस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरून गणेश वाघमारे (१८), योगिराज वाघमारे (४०) आणि धनराज वाघमारे (५०, रा. संदेशनगर, मार्केटयार्ड) या तिन जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
    हा प्रकार भिमाले कॉम्प्लेक्सच्या पार्किंगमध्ये मंगळवारी संध्याकाळी सहाच्या सुमारास घडला. याप्रकरणी पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हनुमंत आणि आरोपी गणेश वाघमारे हे मित्र असून, ते सोसायटीच्या पार्किंगमध्ये गप्पा मारत बसले होते. यावेळी त्यांच्यात चेष्टा मस्करी सुरू होती. अचानक गणेशला हनुमंतने केलेल्या मस्करीचा राग आल्याने त्याने इतर दोघांना बोलवत हनुमंतला शिवीगाळ करत लोखंडी शस्त्रासह बांबूने मारहाण करण्यास सुरूवात केली
    यावेळी डोक्याला मार लागल्याने हनुमंत गंभीर जखमी झाला. योगीराज च्या हातात बांबु होता तर धनराज लाथाबुक्क्यांनी हनुमंतला मारत होता. हनुमंतवर सध्या खासगी रुग्णालयात उपचार सुरू असून, याप्रकरणाचा पुढील तपास सहायक पोलिस निरीक्षक कांबळे करत आहेत

    Related post

    समाजासाठी मोठं हृदय – कालिदास ढमढेरे यांची ५ लाखांची देणगी

    समाजासाठी मोठं हृदय – कालिदास ढमढेरे यांची ५ लाखांची…

    भीमनगर येथील गो-हे खुर्द येथे समाज मंदिराच्या उद्घाटन सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर एक प्रेरणादायी घटना घडली आहे. स्थानिक उद्योजक मा. श्री. कालिदास (दादा)…
    गुलटेकडी मार्केटयार्ड अडते असोसिएशन निवडणुकीत ८०१ मतदार मतदानाचा हक्क बजावणार

    गुलटेकडी मार्केटयार्ड अडते असोसिएशन निवडणुकीत ८०१ मतदार मतदानाचा हक्क…

    प्रतिनिधी : सचिन गाडे पुणे: गुलटेकडी येथील श्री छत्रपती शिवाजी मार्केटयार्ड अडते असोसिएशनच्या निवडणुकीत यंदा एकूण ८०१ मतदार मतदानाचा हक्क बजावणार…
    कसबा पेठेत न्यू गंधर्व बँडकडून अनधिकृत शेड व रस्त्यावर गाड्यांचे अतिक्रमण; नागरिक त्रस्त

    कसबा पेठेत न्यू गंधर्व बँडकडून अनधिकृत शेड व रस्त्यावर…

    पुण्यातील कसबा पेठ परिसरात न्यू गंधर्व बँड या व्यवसायिकाकडून अनधिकृत शेड उभारणे, डेकोरेशनचे साहित्य सार्वजनिक जागांवर अस्ताव्यस्त ठेवणे आणि बँडच्या गाड्या…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *