• August 22, 2023
  • No Comment

बारामतीत महिलेचे हातपाय बांधून कोटींचा दरोडा ६ जण जेरबंद

बारामतीत महिलेचे हातपाय बांधून कोटींचा दरोडा ६ जण जेरबंद

बारामती : एप्रिल महिन्यात शहर परीसरातील देवकातेनगर परीसरात एका कुटुंबातील एका महिलेचे महिलेचा हात-पाय बांधत तिला मारहाण करीत १ कोटी ७ लाखांचा दरोडा सुमारे साडेतीन महिन्यांनंतर उघडकीस आला आहे.पुणे ग्रामीण पोलिसांच्या स्थानिक गुन्हे शाखेने या प्रकरणी सहाजणांना अटक केली आहे.ज्योतिषाकडून मुहुर्त काढुन आरोपींनी हा गुुन्हा केल्याची माहिती तपासात पुढे आली आहे

पोलीस सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, सचिन अशोक जगधणे (वय ३०, रा. गुणवडी, २९ फाटा, ता. बारामती), रायबा तानाजी चव्हाण (वय ३२, रा. शेटफळ हवेली, ता. इंदापूर), रविंद्र शिवाजी भोसले (वय २७, रा. निरावागज, बारामती), दुर्योधन उर्फ दिपक उर्फ पप्पू धनाजी जाधव (वय ३५, रा. जिंती हायस्कूलजवळ, ता. फलटण, जि. सातारा), नितीन अर्जून मोरे (वय ३६, रा. धर्मपुरी, ता. माळशिरस, जि. सोलापूर) याच्यासह रामचंद्र वामन चव्हाण (वय ४३, मूळ रा. आंदरुड, ता. फलटण, जि. सातारा, सध्या रा. वडूज, ता.खटाव, जि. सातारा) अशी या दरोड्यातील आरोपींची नावे आहेत.

देवकातेनगर येथे सागर शिवाजी गोफणे व त्यांची पत्नी दोन मुलांसह राहतात. दि. २१ एप्रिल रोजी सागर हे तिरुपती बालाजीच्या दर्शनाला गेले होते. तर त्यांची पत्नी व मुले घरी होती. यावेळी रात्री आठ वाजता अनोळखी चोरट्यांनी त्यांच्या घराच्या कंपाऊंडवरून प्रवेश केला. पत्नीला मारहाण करत त्यांचे हात-पाय बांधले. तोंडात कापडाचा बोळा कोंबून घरात प्रवेश केला होता. ९५ लाख ३० हजाराची रोख रक्कम, ११ लाख ५९ हजार रुपयांचे २० तोळे दागिने, ३५ हजार रुपयांचा मोबाईल असा १ कोटी ७ लाख रुपयांचा ऐवज जबरीने चोरून नेला होता. याबाबत अज्ञातांविरोधात तालुका पोलिस ठाण्यात दरोड्यााच गुन्हा दाखल करण्यात आला होता. या घटनेमुळे बारामती शहरात खळबळ उडाली होती. विशेष पोलिस महानिरीक्षक सुनील फुलारी हे स्वत: या तपासाबाबत लक्ष ठेवुन होते. त्यानुसार पोलिस अधिक्षक अंकित गोयल यांनी स्थानिक गुन्हे शाखेची पथके नेमली होती. तांत्रिक विश्लेषण व गोपनीय खबरीच्या आधारे अखेर दरोडेखोरांना जेरबंद करण्यात आले. विशेष म्हणजे आरोपींनी आपण पकडले जावू नये, याची पुरेपुर खबरदारी घेतली होती. कोणताही मागमूस मागे ठेवला नव्हता. या गुन्ह्यातील आरोपी एमआयडीसीतील मजूर असल्याची माहिती मिळाल्यानंतर संशयितांवर बारकाईने नजर ठेवण्यात आली. वेगवेगळ्या ठिकाणाहून त्यांना ताब्यात घेण्यात आले या घटनेत अद्यापपर्यंत पोलिसांनी ७६ लाख ३२ हजार रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला आहे. त्यात ६० लाख ९७ हजाराची रोख रक्कम असून १५ लाख ३५ हजार रुपये किमतीचे २६ तोळ्याचे दागिने हस्तगत करण्यातआले आहेत

Related post

खुनाच्या गुन्ह्यातील आरोपीस जामीन मंजूर 

खुनाच्या गुन्ह्यातील आरोपीस जामीन मंजूर 

    पुणे; खून प्रकरणात कलम ३०२, २०१ आरोपी गुन्हा कबुलीचे निवेदन असताना आरोपी नामे अब्दुला उर्फ बबलू सरदार यास जिल्हा…
मित्राबरोबर फिरायला बोपदेव घाटात गेलेल्या  तरुणीवर रात्री गँगरेप

मित्राबरोबर फिरायला बोपदेव घाटात गेलेल्या तरुणीवर रात्री गँगरेप

लुटमारीच्या घटना कायम होत असतात, परंतु मित्रासोबत फिरायला गेलेल्या एका महिलेवर तिन जणांनी बलात्कार केल्याची गंभीर घटना काल रात्री घडली. या…
घरफोडी करणारा अट्टल गुन्हेगार जेरबंद ! घरफोडीचे ०३ गुन्हे उघड गुन्हे शाखा युनिट ६ ची कारवाई

घरफोडी करणारा अट्टल गुन्हेगार जेरबंद ! घरफोडीचे ०३ गुन्हे…

गुन्हे शाखा युनिट-६ कडील पथक युनिट हद्दीत गुन्हे प्रतिबंधात्मक व गुन्हेगार चेकिंग पेट्रोलिंग करित असताना युनिटकडील अंमलदारास मिळालेल्या गुप्त बातमी वरुन…

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *