- August 22, 2023
- No Comment
कल्याण येथील पूर्व भागातील एका इंग्रजी शाळेतील शिक्षकाने एका पाच वर्षाच्या विद्यार्थ्यावरअतिप्रसंगाचा प्रयत्न
कल्याण- येथील पूर्व भागातील एका इंग्रजी शाळेतील शिक्षकाने एका पाच वर्षाच्या विद्यार्थ्यावर शाळेच्या स्वच्छतागृहात अतिप्रसंग करण्याचा प्रकार उघडकीला आला आहे. याप्रकरणी पालकांकडून कोळसेवाडी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल होताच पोलिसांनी याप्रकाराची चौकशी करुन समीर कदम या शिक्षकाला अटक केली आहे.पोलिसांनी सांगितले, कल्याण पूर्वेतील एका इंग्रजी शाळेत पीडित विद्यार्थी शिक्षण घेतो. शुक्रवारी शाळेतील स्वच्छतागृहात गेल्यावर आरोपी शिक्षकाने त्याच्यावर तेथे अतिप्रसंग करण्याचा प्रयत्न केला. या प्रकाराने भयभीत झालेल्या मुलाने घरी येऊन पालकांना शाळेत घडला प्रकार सांगितला. कदम शाळेत नृत्य शिकवण्याचे काम करतो.
शाळेला दोन दिवस सुट्टी असल्याने सोमवारी सकाळी पीडित मुलाचे पालक शाळेत पोहचले. त्यांनी व्यवस्थापन पदाधिकाऱ्यांना घडला प्रकार सांगितला. त्यांनाही हा प्रकार ऐकून धक्का बसला. व्यवस्थापनाने या शिक्षकाची अंतर्गत चौकशी सुरू केली आहे. कोळसेवाडी पोलिसांनी शाळेतील सीसीटीव्ही चित्रण तपासून आरोपी शिक्षकाला अटक केली
या शिक्षका विरुध्द पाॅक्सो कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे