• May 24, 2023
  • No Comment

घरजावयाने सासूच्या अंगावर गरम पाणी फेकून तिला केली मारहाण मारहाणीत सासूचे दोन दात तुटले

घरजावयाने सासूच्या अंगावर गरम पाणी फेकून तिला केली  मारहाण  मारहाणीत सासूचे दोन दात तुटले

    पुणे: घरात राहू नको, असे सांगितल्याने चिडलेल्या घरजावयाने सासूच्या अंगावर गरम पाणी फेकून तिला मारहाण केली. सासूचे डोके फरशीवर आपटल्याने तिचे दात पडले. या प्रकरणी घरजावयाला खडकी पोलिसांनी अटक केली.
    सुजाता कैलास शिंदे (वय ५०) असे जखमी झालेल्या सासूचे नाव असून त्यांच्यावर ससून रुग्णालयात उपचार सुरू असल्याची माहिती पोलिसांनी दिली. या प्रकरणी खडकी पोलिसांनी महेंद्र सिद्धनाथ तोरणे (वय २५, रा. आर्मी क्वार्टर, सर्वत्र विहार, मुळा रस्ता, खडकी) याला अटक करण्यात आली आहे. याबाबत सासू सुजाता शिंदे यांनी फिर्याद दिली आहे. सुजाता शिंदे खडकीतील दारूगोळा कारखान्यात कामाला आहेत. शिंदे यांची मुलगी आणि जावई तोरणे त्यांच्याकडे राहायला आहे. जावई तोरणे याच्याशी त्यांचा वाद झाला. शिंदे यांनी त्याला घरात राहू नको, असे सांगितले.
    त्यानंतर तोरणेने सासूच्या अंगावर गरम पाणी ओतले. सासूचे डोके फरशीवर आपटले. मारहाणीत सासूचे दोन दात तुटले. सासू सुजाता शिंदे यांच्या चेहऱ्यावर गरम पाणी फेकल्याने त्या भाजल्या आहेत. त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. पोलीस उपनिरीक्षक बेंदगुडे तपास करत आहेत

    Related post

    टिकली व टिळा धागा चालणार नाही पण हिजाब चालेल असा धार्मिक तेढ निर्माण करणाऱ्या लेन्स कार्ड lenskart या कंपनीचा मनसे कडून जाहीर निषेध

    टिकली व टिळा धागा चालणार नाही पण हिजाब चालेल…

    लोणी काळभोर: लेन्स कार्ड हे विवाद मध्ये सापडले आहे. कंपनीचे सीईओ पियुष बंसल यांनी ग्रुमिंग गाईड असा एक स्टेटमेंट काढले आहे.…
    हमाल पंचायत निवडणुकीत एकनिष्ठ पॅनेलचा सर्व जागा जिंकत एकतर्फी विजय; अध्यक्षपदी गोरख मेंगडे

    हमाल पंचायत निवडणुकीत एकनिष्ठ पॅनेलचा सर्व जागा जिंकत एकतर्फी…

    प्रतिनिधी : सचिन गाडे पुणे : ज्येष्ठ कामगार नेते डॉ. बाबा आढाव यांच्या निधनानंतर झालेल्या हमाल पंचायतच्या त्रैवार्षिक निवडणुकीत गोरख मेंगडे…
    गुलटेकडी मार्केटयार्ड अडते असोसिएशन अध्यक्षपदी सौरभ कुंजीर बिनविरोध; १७ उमेदवार बिनविरोध, केळी विभागातील एका जागेकारिता मतदान.

    गुलटेकडी मार्केटयार्ड अडते असोसिएशन अध्यक्षपदी सौरभ कुंजीर बिनविरोध; १७…

    प्रतिनिधी : सचिन गाडे पुणे : गुलटेकडी मार्केट यार्डातील श्री छत्रपती शिवाजी मार्केटयार्ड अडते असोसिएशनच्या अध्यक्षपदी सौरभ कुंजीर यांची बिनविरोध निवड…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *