- September 16, 2022
- No Comment
महाळुंगे: कंपनीत बत्तीस लाख रुपये चोरणार त्रिकूट गजाआड
महाळुंगे: महाळुंगे येथील कंपनीतील 32.92 लाख रुपये किंमतीचा माल चोरल्याप्रकरणी 3 जणांना अटक करण्यात आली आहे.याबाबत काळूराम बच्चे (वय 27) यांनी 14 सप्टेंबर रोजी महाळुंगे पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
रंजन परिदा, (वय 35, रा.महाळुंगे इंगळे ता.खेड),किरण कच्छवे (वय 28,रा.चाकण ता.खेड) व शिशुपालसिंग अजरबिहारी, (वय 22, रा महाळुंगे इंगळे, ता.खेड) या तीन आरोपींना अटक करण्यात आले आहे. त्यांच्या विरोधात माळुंगे पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांच्या पॅरामाउंट पॉलीमर्स प्रा.लि, म्हाळुंगे इंगळे तालुका खेड जिल्हा पुणे या कंपनीमधून आरोपींनी संगनमताने मिळून कॉपर मेटल 950 किलो व निकेल मेटल 900 किलो असा एकूण 32.92 लाख रुपये किंमतीचा माल फेब्रुवारी ते ऑगस्ट दरम्यान चोरून नेला आहे.