- September 16, 2022
- No Comment
सांगवीत सराफाच्या पेढीत १७ लाखांची चोरी
सांगवी: सांगवीतील सराफी पेढीत काम करणाऱ्या कामगारानेच १७ लाख रुपयांचे दागिने घेऊन पोबारा केला आहे.सांगवीतील सराफी पेढीत काम करणाऱ्या कामगारानेच १७ लाख रुपयांचे दागिने घेऊन पोबारा केला आहे. या चोरीप्रकरणी सांगवी पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.या प्रकरणी पेढीचे व्यवस्थापक कैलास यादव वारे (वय ४७, रा. देवकर पार्क, पिंपळे गुरव) यांनी पोलिसांकडे फिर्याद दिली आहे. त्यानुसार, मंजुनाथ लक्ष्मण बिराजदार (रा. विनायकनगर, पिंपळे गुरव) याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे