- September 16, 2022
- No Comment
म्हाळुंगे: गांजा बाळगल्याप्रकरणी एकास अटक
म्हाळुंगे: 2.80 लाख रुपये किमतीचा 11 किलो गांजा बाळगल्याप्रकरणी एकास म्हाळुंगे चौकी पोलिसांनी अटक केली आहे.
संदीप पाटील, (वय 38, पोलीस नाईक, अमली पदार्थ विरोधी पथक, गुन्हे शाखा, पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालय) यांनी फिर्याद दिली आहे. मुरुगन नाडार (वय 52, रा.माळुंगे इंगळे, ता.खेड, जि.पुणे) या आरोपीला अटक केली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फरार आरोपीचा शोध चालू आहे.13 सप्टेंबर रोजी दुपारी 3.50 च्या सुमारास महाळुंगे इंगळे गावाच्या हद्दीत आरोपीने एकूण 2 लाख 80 हजार 150 रुपये किमतीचा 11 किलो 206 ग्रॅम वजनाचा गांजा विक्रीकरिता आणला होता. हा गांजा त्याने एका अज्ञात व्यक्तीकडून आणल्याचे नाडार यांने सांगितले.
पुढील तपास म्हाळुंगे पोलिस करत आहेत.