- September 16, 2022
- No Comment
सैराट फेम सुरज पवारला अटक होण्याची शक्यता, फसवणूक प्रकरणी कारवाई होणार
अहमदनगर: अहमदनगर जिल्ह्यात एक फसवणुकीचा धक्कादायक प्रकार समोर आलाय. नोकरीचे आमिष दाखवून फसवणूक करण्यात आलीय. धक्कादायक बाब म्हणजे या प्रकरणात सैराट फेम प्रिन्स अर्थात अभिनेता सुरज पवार याचाही सहभाग असल्याचे समोर आले आहे. या प्रकरणी संशयितांवर गुन्हा दाखल करण्यात आला असून तिघांना अटक देखील करण्यात आलीय. दत्तात्रय क्षिरसागर रा. नाशिक आकाश शिंदे आणि ओमकार तरटे दोघेही राहणार संगमनेर अशी अटक करण्यात आलेल्या तिघांची नावे आहेत.