- September 16, 2022
- No Comment
हडपसरमधील मुंढवा पुल असो वा रामटेकडीचा उड्डाणपूल,सामान्यांना वाहतुकीचा होतोय नाहक त्रास
हडपसर: हडपसरला नव पुणं म्हणले तर काही वावग ठरणार नाही.हडपसर परीसर वेगाने वाढतोय.त्याचा रस्त्यावर ताण यायला लागलाय.बेशिस्त वाहतुकीचा फटका सामान्यांना बसु लागलाय.हडपसरमधील मुंढवा पुल असो वा रामटेकडीचा उड्डाणपूल,गाड्या विरुद्ध दिशेने आल्याने वाहतुकीचा प्रचंड खोळंबा होऊ लागलाय.कित्येकदा लेनची शिस्त न पाळल्याने रुग्णवाहिकेलाही ताटकळत थांबावे लागतानाचे चित्र दिसत आहेत.अपुरे वाहतूक पोलीसांमुळे कधीकधी वाहतुक कर्मचाऱ्यांची भुमिका ही सामान्यांना घ्यावी लागते व वाहतूक सुरळीत करावी लागते.शासनाच्या ढिसाळ नियोजन व खराब रस्त्यांमुळे हा त्रास वाढतो आहे.