- September 16, 2022
- No Comment
गुंगीचे औषध देऊन तरुणीवर वारंवार बलात्कार, आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल
पुणे: गुंगीची औषध देऊन एका व्यावसायिकाने आपल्याकडे काम करणाऱ्या सव्वीस वर्षे तरुणीवर वारंवार बलात्कार केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. या तरुणीने दिलेल्या तक्रारीनंतर संबंधित व्यवसायिकाविरोधात खडक पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत 26 वर्षीय तरुणीने तक्रार दिली आहे. हा प्रकार जानेवारी 2021 ते फेब्रुवारी 2022 या कालावधीत घडला आहे.उदयन सरूश जैन (वय 27) असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे.
पोलीसांनी दिलेल्या माहिती नुसार, कामानिमित्त वेगवेगळ्या राज्यात गेल्यानंतर आरोपीने शीतपेयातून गुंगीचे औषध देऊन मालकानेच तिच्यावर अत्याचार केले आहेत. तर, त्याचे फोटो व व्हिडीओ देखील काढले आहेत.याप्रकरणी खडक पोलीस ठाण्यात व्यावसायिक जैन याचे टिंबर मार्केट भागात आर्किटेक्चरचे ऑफिस आहे.त्याठिकाणी तरूणी नोकरीस होती. कामानिमित्त मध्य प्रदेश व आंध्र प्रदेश येथे दोघे गेल्यानंतर त्याने कोलड्रींक्समध्ये तरूणीला गुंगीचे औषध देऊन तिच्यावर अत्याचार केल्याचे तक्रारीत म्हटंले आहे.
पुढील तपास खडक पोलीस करत आहेत.