- September 16, 2022
- No Comment
उच्चशिक्षित सुनेचा अमानुष छळ, सासरच्या लोकांविरुद्ध गुन्हा दाखल
लोणी काळभोरः पुण्यातील लोणी काळभोर परिसरात अंधश्रद्धेच्या नावाखाली एका 26 वर्षीय उच्चशिक्षित सुनेचा अमानुष छळ करण्यात आला.काळे कपडे घातल्यास तुला मूल होणार नाही, अश्लील व्हिडिओ दाखवून तिच्यासोबत अनैसर्गिक कृत्य करणे, मारहाण करणे यासारखे प्रकार वारंवार घडले.
यानंतर या महिलेने दिलेल्या तक्रारीवरून सासरच्या लोकांविरुद्ध लोणी काळभोर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.
पती प्रतीक शरद गिरमे, सासरे शरद कृष्णाजी गिरमे, सासु सुरेखा शरद गिरमे आणि इतरांवर हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या महिलेचे सासरवाडी हडपसर परिसरात असल्याने हडपसर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलीसांनी दिलेल्या माहिती नुसार, फिर्यादी महिला आणि तिचा पती उच्चशिक्षित आहेत. तर सासू-सासरे आणि दिर एका धार्मिक संस्थेची संबंधित आहेत. मात्र सुनीला अंधश्रद्धेच्या नावाखाली सासरची लोक सतत त्रास देत होती. काळे कपडे घालू नये, काळे कपडे घातल्यास मूल होत नाही, माताजी नी दिलेले कुंकू लावण्यास भाग पाडणे, कुंकू पुसल्यास शिवीगाळ करून मानसिक त्रास देणे असे प्रकार वारंवार सुरू होते. याशिवाय लग्नानंतर पतीने वारंवार पॉर्न व्हिडिओ दाखवून फिर्यादीवर अनैसर्गिक अत्याचार केले होते.
दरम्यान या सर्व प्रकारानंतर पिडीत महीलेने पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. याप्रकरणी आरोपींवर गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास हडपसर पोलीस करत आहेत.