• September 17, 2022
  • No Comment

नर्‍हे: सहा वाहनांना आग

नर्‍हे: सहा वाहनांना आग

नर्‍हे: नर्‍हे येथील हरिहरेश्वर पार्क, बी विंग, माताजी नगर येथे शुक्रवारी मध्यरात्री आग लागल्याची माहिती अग्नीशमन दलाकडे येताच नवले अग्निशमन केंद्राचे वाहन रवाना झाले.

घटनासथळी पोहोचताच इमारतीच्या पार्किंगमध्ये वाहनांना आग लागल्याचे पाहताच जवानांनी आगीवर पाण्याचा मारा करुन आग पुर्ण विझवत धोका दूर केला.

तत्पुर्वी अग्नीशमन दलाची मदत पोहचण्याआधी स्थानिकांनी बादली व नळीच्या साह्याने पाणी मारत आग विझविण्याचा प्रयत्न केला असल्याचे निदर्शनास आले. अग्निशमन दलाकडून वेळोवेळी शहरात राबविण्यात येणारी अग्निशमन सुरक्षाविषयक प्रात्यक्षिक व संवाद यामुळे नागरिकांमध्ये आग व त्याच्या सुरक्षेबाबत जागरूकता निर्माण झाल्याचे दिसून येत आहे.

आगीमधे 4 दुचाकी व 2 चारचाकी वाहनांचे नुकसान झाले.तसेच पार्किंगच्या वरील सिलिंगच्या काही भागाला आगीची झळ लागल्याचे दिसून आले. सदर इमारत ही तळमजला अधिक सहा मजले अशी असून आगीचे कारण समजू शकले नाही.

या कामगिरीत नवले अग्निशमन केंद्राचे अधिकारी प्रकाश गोरे, वाहनचालक पांगारे तसेच जवान भरत गोगावले, शिंदे व मदतनीस नलवडे, मछिंद्र यांनी सहभाग घेतला.

 

 

Related post

गुंठेवारी खरेदी-विक्रीचा मार्ग मोकळा! ५ टक्के शुल्क भरा अन्‌ गुंठेवारी खरेदी-विक्रीस मिळवा परवानगी; आसा करा अर्ज

गुंठेवारी खरेदी-विक्रीचा मार्ग मोकळा! ५ टक्के शुल्क भरा अन्‌…

सर्वसामान्‍य नागरिकांनी खरेदी केलेल्‍या एक, दोन, तीन किंवा चार-पाच गुंठे क्षेत्राचे तुकडे नियमित करण्‍यास प्रांताधिकाऱ्यांकडून मान्यता दिली जात आहे. त्यासाठी पूर्वी…
तुमचं वीजबील जास्त येतंय? करा हा उपाय!

तुमचं वीजबील जास्त येतंय? करा हा उपाय!

तुमची वीजबिले कधी कल्पनेपेक्षा जास्त आली आहेत का? वीज वाचवत असूनही जास्त बिल येत असेल तर तुमच्या वीजमीटरमध्ये काहीतर गडबड किंवा…
महावितरणची लकी ड्रॉ डिजिटल ग्राहक योजना

महावितरणची लकी ड्रॉ डिजिटल ग्राहक योजना

महावितरणने ऑनलाइन वीजबिल भरणाऱ्या ग्राहकांचा टक्का वाढवण्याच्या हेतूने लकी ड्रॉ डिजिटल ग्राहक योजना सुरू केली आहे. या योजनेसाठी 31 मार्च 2024…

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *