- September 17, 2022
- No Comment
पिंपरी:चोरट्यांचा धुमाकुळ,चोरी लूटमार करण्याची नविन पद्धत
पिंपरी: दिवसेंदिवस चोरी लूटमार करण्याच्या पद्धतीही बदलत आहेत. वल्लभनगर येथे एक तरुणाचे अपहरण करून त्याचा मोबाईल घेत जबरदस्ती गूगल पे वरून पैसे काढून घेतले आहेत.
या प्रकरणी सुयश प्रमोद पाटील (वय 21 रा.पिंपरी) यांनी पिंपरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली असून तीन अनोळखी व्यक्तींविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी पायी चालत जात असताना आरोपी दुचाकीवरून आले व त्यांनी फिर्यादीला अडवून डोळ्यावर, पोटात बुक्क्या मारत मारहाण करण्यास सुरुवात केली. तसेच जीवे मारण्याची धमकी देत गाडीवर जबरदस्ती बसवून घेऊन जात त्यांचा मोबाईल काढून घेतला व गुगल पे द्वारे जबरदस्ती पैसे काढून घेतले.यावरून पिंपरी पोलीस पुढील तपास करत आहे.