- September 17, 2022
- No Comment
अधिकाऱ्याला लाच घेताना रंगेहाथ पकडले, लाचलुचपत प्रतिबंधक विभागाची कामगिरी
आळंदी: ग्रामपंचायतमध्ये झालेली अनियमितता न दाखवण्यासाठी सहायक लेखा परीक्षा अधिकाऱ्याने ग्राम विकास अधिकाऱ्याकडे 30 हजार रुपये लाच मागितली.याप्रकरणी त्याला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (एसीबी) अटक केली आहे.ही कारवाई पीसीएस चौक, आळंदी येथे करण्यात आली.
महेश एकनाथ म्हात्रे (वय 42, रा. पिंपळे गुरव) असे अटक केलेल्या सहायक लेखा परीक्षा अधिकाऱ्याचे नाव आहे.याप्रकरणी ग्रामविकास अधिकारी जगन्नाथ परशुराम जगदाळे (वय 55, रा. राजगुरूनगर) यांनी आळंदी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपीने फिर्यादी यांच्या अखत्यारीत असलेल्या ग्रामपंचायतीच्या लेखा परीक्षणामध्ये अनियमितता न दाखवणे तसेच वसुलीचा रिपोर्ट न पाठविण्यासाठी 30 हजारांची लाच मागितली. त्याबाबत फिर्यादी यांनी एसीबीकडे तक्रार केली. एसीबीने सापळा रचुन आरोपी सहायक लेखा परीक्षा अधिकाऱ्याला लाच घेताना रंगेहाथ पकडले.